Wednesday, August 19, 2026
Homeचंद्रपूरअखेर वैनगंगा नदीत बुडालेल्या 'त्या' तीन विद्यार्थ्यांचे सापडले मृतदेह.. - व्हॉलिबॉल खेळतांना...

अखेर वैनगंगा नदीत बुडालेल्या ‘त्या’ तीन विद्यार्थ्यांचे सापडले मृतदेह.. – व्हॉलिबॉल खेळतांना गेले होते खोल पाण्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील व्याहाड (बु.)येथील वैनगंगा नदीपात्रात गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील आठ विद्यार्थी व्हॉलिबॉल खेळत असतांना बॉल पाण्यात गेला.त्यामुळे एकजण त्याच्या मागे धावला आणि खोल पाण्यात गेला.त्याला वाचविण्याच्या प्रयत्नात तिघे धावले असता,त्यापैकी दोघे आणि खोल पाण्यात गेलेला तरुण बुडाल्याची घटना शनिवार १० मे रोजी घडली.१.पार्थ बाळासाहेब जाधव वय २० वर्षे,रा.पाथरे खुर्द ता.राहुरी जि.अहिल्यानगर, २.गोपाल गणेश साखरे वय २० वर्षे,रा.भडगाव ता.जि.बुलढाणा,३.स्वप्निल उद्धलसिंग शिरे वय २१ वर्षे,रा. रांजणगाव,कमलापूर,वाळूज, छत्रपती संभाजीनगर हे तिघेही वैनगंगा नदीत बुडालेले होते.
पार्थ जाधव,गोपाल साखरे,स्वप्निल शिरे,पवन सतकार,सुजित देशमुख,शिवम जायभाये,सार्थक पाठक व जुनेद शेख हे गडचिरोली शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेत असून ते वसतिगृहात वास्तव्यास होते.शनिवारी आठही विद्यार्थी चंद्रपूर जिल्ह्याच्या सावली तालुक्यातील व्याहाड (बु.)येथील वैनगंगा नदीपात्रात मौज-मस्तीसह व्हॉलिबॉल खेळत होते.अशातच पाण्यात गेलेला बॉल पकडण्यासाठी पार्थ जाधव धावला.बॉल पुढे व पार्थ मागे धावत होता. बॉलच्या नादात तो खोल पाण्यात बुडाला.त्यानंतर गोपाल साखरे,स्वप्निल शिरे व सुजित देशमुख हे धावले, गोपाल व स्वप्निल पार्थला वाचविण्याच्या प्रयत्नात बुडाले.सुजित देशमुख बचावला.घटनेची माहिती सर्वत्र पसरताच पोलीस ताफ्यासह बचाव यंत्रणा शनिवार पासूनच तिघांच्या शोधात वैनगंगा नदी पात्रात शोध मोहीम राबवित होते.अशातच शनिवारी रात्र झाल्याने शोधमोहीम थांबविण्यात आली व काल रविवारी शोध मोहीमे दरम्यान तिघांचेही मृतदेह डोहातून काढण्यात आले.त्यानंतर तिघांचेही मृतदेह ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणी करून  कुटुंबीयांकडे सुपूर्द करण्यात आले.मृतक पार्थ जाधव याच्या कुटुंबाला वैद्यकीय व्यवसायाची पार्श्वभूमी आहे.पार्थचा असा दुर्दैवी मृत्यू झाल्याने जाधव कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.तर चिखलीचा मृतक गोपाल साखरे आणि छत्रपती संभाजीनगरचा स्वप्निल शिरे या दोन विद्यार्थ्यांच्या कुटुंबाची परिस्थिती गरिबीची आहे.एमबीबीएस प्रवेश मिळाल्यानंतर आई-वडील व सर्व नातेवाईक आनंदी होते.मात्र,काळाने झडप घालून हा आनंद हिरावून घेतला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विजेचा जोरदार शॉक; दोन भावांचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त पुणे :-घराजवळ असणाऱ्या जनावरांच्या गोठ्याजवळ विजेचा जोरदार शॉक लागून दोन सख्ख्या चुलत भावांचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना आज,बुधवार १९ ऑगस्ट रोजी सकाळी...

खुद्द पत्नीनेच प्रियकर दिराच्या मदतीने पतीचा काढला काटा.. -अनैतिक संबंधाचा बिन भाड्याच्या खोलीत ‘दी एंड’..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-अनैतिक संबंधात आडकाठी येणाऱ्या पतीचा खुद्द पत्नीनेच प्रियकर चुलत दिराच्या मदतीने काटा काढल्याची घटना वर्धा जिल्ह्याच्या हिंगणघाट तालुक्यातील वडनेर पोलिस ठाण्याच्या...

विद्यमान आमदारांच्या पीए व वाहनचालकांच्या मानधनात वाढ..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्याच्या विधानसभा आणि विधान परिषदेच्या विद्यमान आमदारांचे स्वीय सहाय्यक म्हणजेच पीए आणि वाहनचालकांच्या मानधनात दहा हजार रुपयांची वाढ करण्यात आली आहे.सदरची...

सावधगिरी बाळगा..! नागरिकांनी कोणत्याही अनोळखी लोन किंवा ट्रेडिंग ॲपवर विश्वास ठेवू नये..

उद्रेक न्युज वृत्त :-अल्पावधीत ट्रेडिंगच्या माध्यमातून लखपती करण्याचे तसेच तात्काळ कर्ज देण्याचे आमिष दाखवून अनधिकृत डिजिटल लेंडिंग ॲप्स आणि संशयास्पद कंपन्यांकडून नागरिकांची आर्थिक फसवणूक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!