उद्रेक न्युज वृत्त
देसाईगंज :- तालुक्यातील कोंढाळा-वैनगंगा नदिघाटातून गेली तीन दिवसांपासून अवैधरित्या रेतीचा उपसा केला जात आहे.महसूल विभागाने मारलेली खड्डे न बुजवता रेती तस्करांनी नवीन चौथ्या रेती घाटाचा शोध लावलेला असून बंद असलेली दारे पुन्हा सुरू झाली असल्याने गावात सक्षम तलाठ्याच्या नियुक्तीची मागणी सर्वत्र जोर धरू लागली असल्याचे वृत्त उद्रेक न्युजने २३ जानेवारी रोजी प्रकाशीत केले होते.
वृत्त प्रकाशीत होताच देसाईगंज महसूल विभाग खळबळून जागे होऊन काल २५ जानेवारी २०२३ रोजी रेती तस्करांनी तयार केलेल्या नवीन चौथ्या रेती घाटावर खड्डा मारला आहे.खड्डा तर मारण्यात आला;मात्र खरोखरच रेती तस्करीवर आळा बसणार काय?अशी चर्चा जनमानसात हळूच दबक्या आवाजात सुरू आहे.