Monday, August 31, 2026
Homeचंद्रपूर२२ वर्षीय तरुणाकडून तलवार जप्त..

२२ वर्षीय तरुणाकडून तलवार जप्त..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-विना परवाना हत्यार बाळगणे गुन्हा असतांनाही मिसरूड फुटण्याच्या अवस्थेत असलेली तरुण पिढी गुन्हेगारीच्या विश्वात पदार्पण करू पाहत आहे.गुन्हेगारीचे जग हे चिरकाल टिकणारे नसून त्याकडे वळण्यापेक्षा सर्वप्रथम शैक्षणिक शिक्षण घेणे आणि जीवनाचे सार्थक करून घेणे आवश्यक झाले आहे.आजची स्थिती आणि उद्याचे उज्वल भवितव्य घडवायचे असेल,तर शिक्षणाशिवाय पर्याय नाही,असे म्हणणे चुकीचे ठरणार नाही.मात्र,काही तरुण हिरोपंती करतांना दिसून येतात. अश्याच प्रकारे नागरिकांमध्ये दहशत निर्माण करू पाहणाऱ्या एका तरुणाचा प्रयत्न भद्रावती पोलिसांनी हाणून पाडला आहे.प्रकरणी भद्रावती पोलिसांनी सुमठाणा चौक परिसरातून एका २२ वर्षीय तरुणास अटक करून त्याच्याकडून धारदार लोखंडी तलवार जप्त केली आहे.प्रज्वल अशोक कोडापे वय २२ वर्षे, रा.शिवाजी नगर,भद्रावती,जि.चंद्रपूर असे आरोपी तरुणाचे नाव आहे.विना परवाना घातक हत्यार बाळगल्याप्रकरणी त्याच्यावर भारतीय हत्यार कायदा कलम ४,२५ अंतर्गत भद्रावती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.प्रकरणी पुढील तपास भद्रावती पोलीस करत आहेत.सदरची कारवाई वरोरा उपविभागीय पोलीस अधिकारी संतोष बाकल यांच्या मार्गदर्शनाखाली भद्रावती पोलीस ठाण्याचे ठाणेदार योगेश्वर पारधी यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक गजानन तुपकर,महेंद्र बेसरकर,पोलीस अंमलदार गोपाल आतकुलवार,जगदीश झाडे,अनुप आष्टुनकर,विश्वनाथ चुदरी,योगेश घाटोळे,खुशाल कावळे,रोहीत चिटगिरे व संतोष राठोड यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!