उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :- लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात शांतता अबाधित राखण्यासाठी पोलिस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनात पोलिस विभागाने सराईत गुन्हेगारांवर प्रतिबंधक कारवाईची धडक मोहीम हाती घेतली आहे.या अनुषंगाने आठवडाभरात १३ अट्टल गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई केली असून तडीपारचे आदेश संबंधित उपविभागीय अधिकाऱ्यांनी निर्गमित केले आहेत.अट्टल गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई करण्यासंदर्भात पोलिस आणि उपविभागीय अधिकाऱ्यांनी आदेश पारीत करताच शुभम अमर समूद वय २६, रा.पंचशील वॉर्ड चंद्रपूर, शाहरुख नुरखा पठाण वय २९, रा.अष्टभुजा वॉर्ड, जयश्री लॉन जवळ चंद्रपूर, नैनेश उर्फ लाला नितीन शहा वय ३१, रा. लुंबिनी नगर, बाबुपेठ वॉर्ड चंद्रपूर, मोहन केशव कुचनकर वय २५, रा.चिचघर ले-आऊट वरोरा, दर्शन उर्फ बापू अशोक तेलंग वय २२, रा. मौलाना आझाद वॉर्ड बल्लारपूर,मुनीर खान वहिद खान पठाण वय ५५, रा.शिवनगर नागभीड,शिवशाम उर्फ भिस्सू दामोदर भुर्रे वय २५, रा.हनुमान नगर, ब्रह्मपुरी यांना कलम ५६ (१) (अ) (ब) मपोका अन्वये सहा महिन्यांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातून तडीपार केले आहे.तर आठवडाभरात आतापर्यंत एकूण १३ गुन्हेगारांवर तडीपारची कारवाई केली असून यात वरील सात गुन्हेगार आणि अरविंद बापुजी उरकुडे वय ४५, रा.अमराई वॉर्ड घुग्घुस, प्रताप रमेश सिंग वय २६, रा.अमराई वॉर्ड घुग्घुस, श्यामबाबू चंद्रपाल यादव वय २९, रा. रयतवारी कॉलरी,चंद्रपूर,राजेश मुन्ना सरकार वय ४७, रा. इंडस्ट्रीय वॉर्ड, बंगाली कॅम्प चंद्रपूर,संतोष उर्फ विक्की भास्कर दुसाने वय ३०, रा.सिस्टर कॉलनी चंद्रपूर,अरबाज जावेद कुरेशी वय २६, रा.हवेली गॉर्डन चंद्रपूर यांना कलम ५६ (१) (अ) (ब) मपोका अन्वये ६ महिने व १ वर्षांसाठी चंद्रपूर जिल्ह्यातून तडीपार केले आहे.

