Sunday, August 30, 2026
Homeनागपूरओबीसी समाज सैरभैर होण्या मागचे मुख्य कारण म्हणजे नेत्यांच्या कोलांटउड्या…-राष्ट्रीय ओबीसी मुक्ती...

ओबीसी समाज सैरभैर होण्या मागचे मुख्य कारण म्हणजे नेत्यांच्या कोलांटउड्या…-राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा तर्फे पत्रकार परिषदेत खंत व्यक्त…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त 

नागपूर :- देशात मोठ्या संख्येत ओबीसी समाज आहे. मात्र,त्याला त्याचे अपेक्षित हक्क मिळालेले नाहीत. समाजातील नेत्यांच्या कोलांट उड्यामुळे हा समाज आज सैरभैर झाला आहे; अशी खंत राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चा तर्फे पत्रकार परिषदेत व्यक्त करण्यात आली.

प्रत्येक निवडणुकीच्या वेळी ओबीसी समाजाला त्यांचे हक्क आणि न्याय देण्याच्या घोषणा केल्या जातात. प्रत्यक्षात मात्र निवडणुका झाल्यानंतर आश्वासनांची पूर्तता होत नाही.त्यामुळे या लोकसभा निवडणुकीपूर्वी ओबीसी जनतेच्या काय अपेक्षा आहे; त्याचा जाहीरनामा आम्ही जनतेसमोर ठेवत आहोत; असे मत राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचे मुख्य संयोजक नितीन चौधरी यांनी पत्रकार परिषदेत व्यक्त केले.ओबीसी समाजाला नोकरीत,शिक्षणात आरक्षण आहे.मात्र, समाजाच्या विकासासाठी आवश्यक राजकीय हक्क अर्थात निवडणुकांमध्ये आरक्षण मिळत नाही,उच्च पदांवरही आरक्षण मिळत नसल्याचा आरोप त्यांनी केला.एकीकडे नेतेमंडळी विकासाचा विश्वगुरू होण्याची भाषा करतात.मात्र समाजाचे मागासलेपण वाढत असताना हे कसे शक्य आहे; असा प्रश्न त्यांनी केला.यावेळी राष्ट्रीय ओबीसी मुक्ती मोर्चाचा जाहीरनामा प्रकाशित करण्यात आला.पत्रकार परिषदेला गीता महाले,लक्ष्मीकांत मोहोड,भूषण दडवे, असलम खातमी,प्रा.दिवाकर मोहोड आदी उपस्थित होते.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद शाळेत राखी मेकिंग स्पर्धा व रक्षाबंधन कार्यक्रम उत्साहात संपन्न.. -विद्यार्थ्यांनी देसाईगंज पोलिस बांधवांना राखी बांधून व्यक्त केली...

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज शहराच्या 'पीएम श्री छत्रपती शिवाजी महाराज नगर परिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा' येथे आज,शनिवार २९ ऑगस्ट रोजी 'एक राखी देशाचे...

पोलीस दलात खळबळजनक घटना..! पोलीस उपनिरीक्षकाने धावत्या रेल्वे समोर घेतली उडी; घटनास्थळीच मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच १६ ऑगस्ट २०२६ रोजी नागपूर पोलिस आयुक्त कार्यालयातील जनसंपर्क व अर्ज शाखेत कार्यरत असलेले सहाय्यक पोलिस निरीक्षक (एपीआय)यांनी शासकीय निवासस्थानी गळफास...

देसाईगंज तालुक्यात रोजगार हमीच्या कामांमध्ये मोठा भ्रष्टाचार.. – काम न करताच उचलली लाखो रुपयांची बिले..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्यात यंत्रणा स्तरावरून करण्यात आलेल्या रोजगार हमी योजनेच्या कामांमध्ये मोठा कथित भ्रष्टाचार झाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.यात अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या...

सर्व अन्न विक्रेते व्यावसायिकांना परवाना घेणे बंधनकारक.. – पाणीपुरी पासून ते चहा विक्रेते व इतर परवाना नसणाऱ्यांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त :-अन्न व्यावसायिक विक्रेत्यांना व्यवसाय करण्यासाठी अन्न सुरक्षा व मानके कायदा २००६ चे कलम ३१ अंतर्गत परवाना घेणे किंवा नोंदणी प्रमाणपत्र घेणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!