Tuesday, September 1, 2026
Homeचंद्रपूरसामाजिक कार्यकर्ता आणि सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यांच्यात भर चौकातच राडा...

सामाजिक कार्यकर्ता आणि सहाय्यक पशुधन विकास अधिकारी यांच्यात भर चौकातच राडा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-रस्त्यावरील उभी दुचाकी काढण्याच्या वादात सहायक पशुधन अधिकारी डॉ.गजानन तेलकापल्लीवार आणि विधानसभा निवडणुकीची तयारी करणारे चंद्रपूरचे सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे यांच्यात भर चौकातच हाणामारी झाली.ही खळबळजनक घटना काल,शुक्रवारी सकाळच्या सुमारास शिवाजी चौकात घडली.याप्रकरणी दोघांनीही एकमेकांविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
चंद्रपुरातील सामाजिक कार्यकर्ते भूषण फुसे हे गोंडपिपरी शिवाजी चौकातील परिसरात सध्या भाड्याची खोली करून राहत आहेत.राजुरा विधानसभा क्षेत्रात निवडणूक लढविण्यासाठी त्यांची तयारी सुरू आहे.सहायक पशुधन अधिकारी डॉ. गजानन तेलकापल्लीवार हे देखील शिवाजी चौक परिसरात राहतात.शुक्रवारी डॉ.तेलकापल्लीवार हे छाया नेवारे यांच्या आजारी शेळीची तपासणी करण्यासाठी गेले होते.दरम्यान,त्यांनी आपली दुचाकी रस्त्याच्या बाजूला उभी केली.त्याच कालावधीत फुसे हे कारने बाहेर जाण्यास निघाले.मात्र,उभ्या दुचाकीमुळे त्यांना कार काढता आली नाही.हॉर्न वाजवूनही डॉ.तेलकापल्लीवार यांनी रस्त्यावर येण्यास उशीर केला.यावरून फुसे व त्यांच्या चालकाने डॉ. तेलकापल्लीवार यांना शिवीगाळ केली.त्यावर वाद वाढला व दोघांमध्ये जोरदार हाणामारी झाली. दरम्यान,नागरिक हा प्रकार पाहून संतापले. नागरिकांसोबत मिळून डॉ.तेलकापल्लीवार यांनीही फुसे यांच्या कारच्या काचा फोडल्या.याप्रकरणी दोघांनी पोलिसांत एकमेकांविरुद्ध तक्रार दाखल केली.
 
भूषण फुसे,सामाजिक कार्यकर्ता👇
मला एका कार्यक्रमाला जायचे असल्याने माझी गाडी निघत नव्हती.रस्त्यावरच दुचाकी असल्याने मी हॉर्न वाजवला.गाडी न काढता उलट त्या डॉक्टरांनी मला शिवीगाळ केली.गाडी काढत नाही,तुला काय करायचे ते कर,असे म्हटल्यावर एकमेकांना शिवीगाळ झाली. थोडा शाब्दिक वाद झाला.डॉ.तेलकापल्लीवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी माझ्या गाडीच्या काचा फोडून भला मोठा दगड माझ्यावर फेकून मारला.जीवघेणा हल्ला केला.
डॉ.गजानन तेलकापल्लीवार,सहाय्यक पशुधन अधिकारी,गोंडपिपरी👇
भूषण फुसे यांनी गाडीचा हॉर्न वाजवला.माझी दुचाकी रस्त्याच्या बाजूला होती.मी आजारी शेळीवर उपचार करत असल्याने मला तिथे पोहोचायला उशीर लागला. गाडी काढायला इतका वेळ का लागला म्हणून गाडीच्या खाली उतरून त्यांनी मला मारहाण केली. त्याच्यानंतर वार्डातील नागरिकांनी हे दृश्य पाहिल्यावर संतप्त होऊन सगळेजण माझ्या मदतीला धावून आल्याने फुसे यांनी पळ काढला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

धक्कादायक..! जेवणाच्या डाळभाजीत पाल; ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-विद्यार्थ्यांच्या जेवणाच्या डाळभाजीत पाल (विचगुर)पडल्याने तब्बल ३० विद्यार्थ्यांना विषबाधेची लक्षणे जाणवू लागल्याची घटना आज,मंगळवार १ सप्टेंबर रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या...

अनाथ बालकांना योजनांचा लाभ वेळेत देण्याचे जिल्ह्याधिकाऱ्यांचे निर्देश..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात महिला व बालकांच्या कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून पात्र लाभार्थ्यांपर्यंत त्यांचा लाभ वेळेत पोहोचवावा.बालविवाह व अल्पवयीन मातांशी...

आजपासून बसमधून प्रवास करणाऱ्या ज्येष्ठ नागरिक व महिला प्रवाशांसाठी ‘एनसीएमसी’ कार्ड अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-एसटी महामंडळाच्या बसेसमधून प्रवास करणाऱ्या विविध सवलतधारक प्रवाशांसाठी आज,मंगळवार १ सप्टेंबर पासून 'नॅशनल कॉमन मोबिलिटी कार्ड' म्हणजेच संपर्करहित स्मार्ट कार्ड (एनसीएमसी)अनिवार्य करण्यात आले...

एकल महिला सर्वेक्षणात नाव न समाविष्ट झालेल्या महिलांना नाव नोंदविण्याची संधी- देसाईगंज नगर परिषदेचे मुख्याधिकारी सतिश चौधरी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज नगर परिषदेच्या महिला व बाल विकास विभागाच्या वतीने देसाईगंज शहरातील एकल प्रकारातील महिलांचे सर्वेक्षण संबंधित वार्डातील महिला बचत गटांच्या सदस्यांच्या माध्यमातून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!