Saturday, July 11, 2026
Homeआरमोरीसात दिवसांपूर्वी पत्नीवर हल्ला चढविणाऱ्या इसमाची गळफास घेऊन आत्महत्या.. - आरमोरी तालुक्यातील...

सात दिवसांपूर्वी पत्नीवर हल्ला चढविणाऱ्या इसमाची गळफास घेऊन आत्महत्या.. – आरमोरी तालुक्यातील घटना..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-सात दिवसांपूर्वी पत्नीवर हल्ला चढविणाऱ्या आरमोरी तालुक्याच्या कोजबी येथील ५५ वर्षीय इसमाने स्वतःच्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना काल, बुधवारच्या रात्री घडली असून आज,गुरुवार ६ मार्चला सकाळच्या सुमारास उघडकीस आली.ताराचंद येडमे वय ५५ वर्षे,रा.कोजबी,ता.आरमोरी,जि.गडचिरोली असे आत्महत्या केलेल्या इसमाचे नाव आहे.
मिळालेल्या माहितीनुसार,ताराचंद येडमे याने सात दिवसांपूर्वी म्हणजेच २७ फेब्रुवारी २०२५ रोजी रात्रीच्या सुमारास पत्नी सोबत झालेल्या कडाक्याच्या भांडणात रागाच्या भरात पत्नीवर लाकूड तासनी अवजाराने (वासला) वार करून गंभीर जखमी केले व स्वतःलाही चाकू भोसकून गंभीररीत्या जखमी केले होते.त्यामुळे पती-पत्नीवर गडचिरोली जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचार सुरू होते.ताराचंद यांच्या प्रकृतीत सुधारणा झाल्याने रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यामुळे ताराचंद हा कोजबी येथील आपल्या राहत्या घरी नुकताच आला होता.ताराचंद यांच्या घरातील
नेहमी दार व खिडक्या सुरू असणाऱ्या आज गुरुवारी सकाळच्या सुमारास बंद दिसल्याने शेजाऱ्यांना संशय आला.त्यामुळे शेजाऱ्यांनी खिडकीतून डोकावून बघितले असता ताराचंद येडमे हा घराच्या आळ्याला नायलॉन दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत दिसून आला.घटनेची माहिती तात्काळ गावच्या सरपंचा कविता ताडाम सह पोलीस पाटिल माधुरी सहारे यांना देण्यात आली.पोलीस पाटील यांनी क्षणाचाही विलंब न लावता आरमोरी पोलीस ठाण्यास कळविले. त्यानुसार आरमोरी पोलीस प्रशासन घटनास्थळी दाखल होत मृताचा पंचनामा करून शव शवविच्छेदनाकरिता ग्रामीण रुग्णालय आरमोरी येथे
 पाठविण्यात आला.घटनेचा पुढील तपास आरमोरी पोलीस प्रशासन करीत आहे.
ताराचंद याने सात दिवसांपूर्वी पत्नीवर हल्ला चढवून गंभीररीत्या जखमी केले होते.त्यामुळे त्याने याच नैराश्यातून आत्महत्या केली असावी,असा अंदाज वर्तविण्यात येत आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

देसाईगंजच्या विहीरगाव(पोटगाव)येथील ‘त्या’ मातेने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस मुलीला जन्म..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव(पोटगाव)येथील रहिवासी स्वाती चांगदेव नेवारे ह्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या असता  आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेद्वारे गोंदियाला रेफर करत असतांनाच काही अंतरावरील मार्गावर...

कुरुडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यात येतील,अशी ग्वाही आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!