Monday, August 24, 2026
Homeआरमोरीविवाहित तरुणाने राहत्या घरीच घेतला गळफास..

विवाहित तरुणाने राहत्या घरीच घेतला गळफास..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
आरमोरी(गडचिरोली):-एका विवाहित तरुणाने घरी कुणीही नसतांना राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज,सोमवार ११ मे रोजी दुपारच्या सुमारास आरमोरी तालुक्याच्या वैरागड येथे उघडकीस आली.अशोक देवराव बोधनकर वय ३६ वर्षे,रा.वैरागड,ता.आरमोरी,जि.गडचिरोली असे गळफास घेऊन आत्महत्या केलेल्या विवाहित तरुणाचे नाव आहे.
शेतात धान मळणीचे काम सुरू असल्याने आज सकाळपासूनच बोधनकर कुटूंबीय शेतावर होते. अश्यातच अशोक हा काही वेळाने घरी परतला व घरी कुणीही नसल्याची संधी साधून त्याने आपल्या राहत्या घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपविली.सदरची घटना दुपारच्या सुमारास उघडकीस येताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत मोठी गर्दी केली.लागलीच घटनेची माहिती मिळताच आरमोरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत घटनेचा पंचनामा करून मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी आरमोरी उपजिल्हा रुग्णालयात पाठवला.आत्महत्येचे कारण अद्याप गुलदस्त्यात असून पुढील तपास आरमोरी पोलीस प्रशासन करीत आहे. अशोकच्या पश्चात वृद्ध आई,पत्नी,एक मुलगा आणि एक मुलगी असा परिवार आहे.घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नालीच्या चेंबरवर मृतावस्थेत आढळला नवजात अर्भक..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील कोराडी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील बोखारा गावातील रस्त्यालगत असलेल्या नालीच्या चेंबरवर नवजात बाळाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात एकच खळबळ...

‘ई-पीक पाहणी’ मोबाईल ॲपच्या कटकटीतून शेतकऱ्यांची सुटका; गावनिहाय नियुक्त सहाय्यकच घेणार नोंदी..

उद्रेक न्युज वृत्त :-शासनाने यंदाच्या 'खरीप हंगाम-२०२६' साठी ई-पीक पाहणीच्या कार्यपद्धतीत  केलेला बदल शेतकऱ्यांसाठी दिलासादायक ठरणार आहे.यापुढे प्रत्येक शेतकऱ्याला स्वतः मोबाइलवरून ई-पीक पाहणी करण्याची...

आज मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ढोल-ताशा वादनाचा नवा विश्वविक्रम..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या  उपस्थितीत आज,रविवार २३ ऑगस्ट रोजी नागपूरच्या रेशिमबाग मैदान येथील आयोजित 'मंथन फॉर युवा' (जेनझी संवाद)कार्यक्रमात ढोल-ताशा...

आज गडचिरोली जिल्ह्यातील पुरामुळे दोन मार्ग बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यात दोन दिवसांपासून अधून-मधून पावसाची संततधार सुरू आहे.पावसामुळे काही ठिकाणची नाले पाण्याने भरभरून वाहू लागले आहेत. अश्यातच काही नाल्यांवरील पुल ठेंगणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!