- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये ५० टक्के पेक्षा जास्त ओबीसी आरक्षण असलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका पुन्हा एकदा लांबणीवर गेल्या आहेत.सर्वोच्च न्यायालयाच्या सुनावणीकडे सर्वांचे लक्ष लागलेले असतांनाच आज,सोमवार ११ मे रोजी झालेल्या
सुनावणीत २० जिल्हा परिषद आणि त्या अंतर्गत येत असलेल्या पंचायत समित्यांच्या निवडणुकीच्या कार्यक्रमासाठी पुढील तारीख देण्यात आली आहे. त्यानुसार,पुढील सुनावणी ही येत्या २१ आणि २२ जुलै २०२६ रोजी होणार आहे.
राज्यातील २० जिल्हा परिषद व पंचायत समित्यांमधील ओबीसी आरक्षण अधिकचे झाल्याने सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणच्या निवडणुका तात्पुरत्या स्थगित केल्या व ज्या ठिकाणी ५० टक्क्याचे आरक्षण अबाधित राहिले,अश्या १२ जिल्हा परिषदा व १२५ पंचायत समितीच्या निवडणुका पार पाडण्यास हिरवा कंदील देण्यात आला.मात्र,उर्वरित निवडणुकांच्या बाबतीत तारीख पे तारीख देण्यात येत असल्याने निवडणुका लवकर घेण्याची मागणी जोर धरत आहे.
- Advertisement -

