Sunday, August 30, 2026
Homeचंद्रपूरअज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोघांचा घटनास्थळीच मृत्यू..

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक; दोघांचा घटनास्थळीच मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-एका अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिल्याने दोन तरुणांचा घटनास्थळीच मृत्यू झाल्याची घटना आज,सोमवार ११ मे रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या चिमूर तालुक्यातील शंकरपूर-भिसी राज्य महामार्गावरील आसोला बसस्थानक नजीक घडली.अमोल अरुण नन्नावरे वय ३० वर्षे,रा.शेगाव खुर्द,ता.भद्रावती व विकास दादाजी जांभुळे वय ३७ वर्षे,रा.टिटवी, ता.चिमूर असे अपघातात मृत पावलेल्या तरुणांची नावे आहेत.
अमोल व विकास हे दोघेही त्यांच्या एमएच ३४ बीए ८०९५ क्रमांकाच्या दुचाकीने टिटवीकडे जात असतांना आसोला बसस्थानकाजवळ मागेहून भरधाव वेगात येणाऱ्या एका अज्ञात वाहनाने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.अपघातात दोघांच्याही डोक्याला गंभीर मार लागल्याने दोघांचाही घटनास्थळीच मृत्यू झाला.अपघात घडताच अज्ञात वाहन चालक वाहनासह पसार झाला. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून पंचनामा केला व दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी चिमूर ग्रामीण रुग्णालयात पाठविण्यात आले.पोलिसांनी अज्ञात वाहनचालकाविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!