Saturday, June 27, 2026
Homeगोंदिया४५ हजार रुपयांची लाच; जिल्हा परिषदेचा लिपिक अडकला एसीबीच्या जाळ्यात..

४५ हजार रुपयांची लाच; जिल्हा परिषदेचा लिपिक अडकला एसीबीच्या जाळ्यात..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गोंदिया :-सेवानिवृत्तीला काही दिवस उरलेले असतांना सेवानिवृत्तीची कागदपत्रे तयार करून देण्यासाठी ५० हजाराची लाच मागून ४५ हजार रुपये स्विकारल्याप्रकरणी गोंदिया जिल्हा परिषदेच्या वित्त व लेखा विभागातील कनिष्ठ लिपिकास लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे.संदेश सांबरे असे लाचखोर कनिष्ठ लिपिकाचे नाव असून त्याच्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रकरणातील तक्रारदार हे गोंदिया जिल्हा परिषदेत कर्मचारी पदावर कार्यरत असून ते येत्या,३१ मे २०२६ रोजी सेवानिवत्त होणार आहेत.सेवानिवृत्तीचा लाभ लवकर मिळावा,यासाठी तक्रारदार यांनी वित्त व लेखा विभागातील कनिष्ठ लिपिकास सेवानिवृत्तीची कागदपत्रे तयार करून देण्याची मागणी केली.दरम्यान,७ मे रोजी आरोपी संदेश सांबरे याने तक्रारदार यांच्याकडे सेवानिवृत्तीची कागदपत्रे लवकर तयार करून देण्यासाठी व त्यांच्या प्रकरणात पे फिक्सेशन बरोबर नसून त्यांच्यावर १ लाख ९२ हजार रुपयांची रिकव्हरी निघत असल्याचे सांगून सदर रिकव्हरी वाचवून देण्याच्या नावावर तब्बल ५० हजार रुपये लाचेची मागणी केली. मात्र,तक्रारदारांना लाच देण्याची ईच्छा नसल्याने त्यांनी काल सोमवारी गोंदिया येथील लाच लुचपत प्रतिबंधक विभागाकडे याप्रकरणी तक्रार दाखल केली.तक्रारीच्या आधारे पथकाने काल दुपारच्या सुमारास सापळा कारवाई केली.यात आरोपी संदेश सांबरे याने तडजोडीअंती  ४५ हजार रुपये स्विकारण्याची तयारी दर्शवली.लाच स्वीकारताच पथकाने रंगेहाथ अटक केली. एसीबीची धाड पडल्याची माहिती जिल्हा परिषद कार्यालयात होताच एकच खळबळ माजली.सदरची कारवाई पोलिस निरीक्षक उमाकांत उगले,अरविंद राऊत, सहाय्यक फौजदार चंद्रकांत करपे,पोलिस हवालदार संजय बोहरे,मंगेश काहालकर,पोलिस नाईक संतोष शेंडे, अशोक कापसे,संतोष बोपचे,प्रशांत सोनवणे,कैलाश काटकर यांच्या पथकाने केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द; पेपरफुटीने खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी 'नीट यूजी-२०२६' ची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करून नव्याने घ्यावी लागल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती.अश्यातच आता...

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

मी काँग्रेसचा निष्ठावंत कार्यकर्ता आहे; पदासाठी किंवा सत्तेसाठी विचारांशी तडजोड करण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.. – विजय वडेट्टीवारांनी शिंदे सेनेतील प्रवेशाचे वृत्त फेटाळले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नुकतेच उद्धव ठाकरे गटातील सहा खासदारांनी शिंदे गटात प्रवेश केल्याने राज्यातील राजकारणात मोठी खळबळ उडाली.खासदारांच्या पक्षप्रवेशामुळे केंद्रात शिंदे गटाचे वजन वाढले...

गडचिरोली शहरात मुला-मुलींचे प्रत्येकी २५० विद्यार्थ्यांची क्षमता असलेली दोन स्वतंत्र शासकीय वसतिगृहे मंजूर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दुर्गम,आदिवासी व ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना जिल्हा मुख्यालयी राहून उच्च शिक्षण घेण्यासाठी सुरक्षित,दर्जेदार आणि सर्व सोयी-सुविधांनी युक्त निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याच्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!