Saturday, October 17, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तसामान्य नागरिकांवर काटकसरीचे आवाहन करतांना स्वतःपासून आणि आपल्या पक्षापासून उपक्रमाची सुरुवात करावी.....

सामान्य नागरिकांवर काटकसरीचे आवाहन करतांना स्वतःपासून आणि आपल्या पक्षापासून उपक्रमाची सुरुवात करावी.. -नाना पटोलेंनी पंतप्रधानांना लिहिले पत्र..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतेच देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवार १० मे रोजी हैदराबाद येथील एका जाहीर सभेत बोलतांना जागतिक परिस्थितीचे गांभीर्य मांडून देशवासीयांना पेट्रोल,डिझेलसह इंधनबचतीचे आवाहन केले.त्याचबरोबर, ‘वर्क फ्रॉम होम’, ऑनलाइन बैठका, व्हिडीओ कॉन्फरन्सिंग या पद्धती पुन्हा सुरू करा.पेट्रोल-डिझेलची बचत करणे ही राष्ट्रीय गरज आहे,असे सांगतांना त्यांनी लग्नासाठी वर्षभर सोने खरेदी टाळण्याचाही सल्ला दिला आहे. ‘जगातील पुरवठा साखळी विस्कळीत झाली असून कच्च्या तेलाचे दर गगनाला भिडले आहेत. कोरोनाकाळात आपण ऑनलाइन बैठका आणि ‘वर्क फ्रॉम होम’ची सवय लावून घेतली होती.आता देशहितासाठी ती पद्धत पुन्हा अंमलात आणण्याची वेळ आली आहे.यामुळे इंधनाचीच बचत होणार नाही,तर देशाचे कोट्यवधींचे परकीय चलनही वाचेल.’ असे त्यांनी स्पष्ट केले.या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे माजी अध्यक्ष तथा भंडारा जिल्ह्याच्या साकोली विधानसभा क्षेत्राचे आमदार नाना पटोले यांनी दुसऱ्याच दिवशी म्हणजेच सोमवार ११ मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींना पत्र लिहून शासकीय दौऱ्यांमध्ये काटकसर करणे तसेच चार्टर विमान व मोठ्या वाहनताफ्यांचा वापर मर्यादित करण्याबाबत कळवले आहे.त्यांनी लिहिलेल्या पत्रात म्हटले की, कालच्या आपल्या भाषणामध्ये आपण देशातील नागरिकांना परदेश दौरे टाळण्याचे,इंधनाचा वापर कमी करण्याचे, मेट्रोसारख्या सार्वजनिक वाहतुकीचा अधिक वापर करण्याचे तसेच अनावश्यक खर्च टाळण्याचे आवाहन केले.देशहिताच्या दृष्टीने नागरिकांनी काटकसरीचा अवलंब करावा,हा संदेश निश्चितच महत्त्वाचा आहे.मात्र,त्याचवेळी आपण स्वीडन,नॉर्वे,युएई आणि इटली या देशांच्या दौऱ्यावर जाणार असल्याचे समजले.तसेच काल तेलंगणा, बेंगळुरू आणि जामनगर येथील आपल्या दौऱ्यांदरम्यान चार्टर विमानांचा वापर करण्यात आला. प्रत्येक ठिकाणी मोठ्या प्रमाणावर रॅली आणि वाहनताफ्यांचे आयोजन करण्यात आले होते. जगभरात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती वाढत असल्याची बाब आपण अधोरेखित केली आहे.अशा परिस्थितीत इंधन बचतीचा संदेश अधिक प्रभावीपणे पोहोचवायचा असेल,तर त्याची सुरुवात सरकारकडून होणे आवश्यक आहे.शासकीय दौऱ्यांमध्ये शक्य तिथे काटकसर करणे,चार्टर विमानांचा वापर मर्यादित ठेवणे तसेच वाहनताफे कमी करणे,हा देखील इंधन बचतीसाठी महत्त्वाचा संदेश ठरू शकतो.सामान्य नागरिकांवर काटकसरीचे आवाहन करतांना लोकप्रतिनिधींनी आणि सत्ताधाऱ्यांनीही त्याच तत्त्वांचे पालन करणे आवश्यक आहे,अशी जनतेची अपेक्षा आहे.त्यामुळे आपण स्वतःपासून आणि आपल्या पक्षापासून या उपक्रमाची सुरुवात करावी,असे नाना पटोले यांनी लिहिलेल्या पत्रात नमूद केले आहे.त्यामुळे,देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचेसह इतर लोकप्रतिनिधी आणि सत्ताधारी याचे पालन करणार काय? असा प्रश्न जनतेकडून उपस्थित केला जातो आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

विविध शिष्यवृत्तीसाठी एनएसपी व महाडीबीटी पोर्टलवर अर्ज नोंदणीचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या मॅट्रिकपूर्व व मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनांसाठी सन २०२६-२७ या शैक्षणिक वर्षातील अर्ज केंद्र शासनाच्या राष्ट्रीय...

बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून तीन लाख रुपयांच्या लाचेची मागणी; १ लाख २० हजार स्वीकारतांना ताब्यात.. -गडचिरोली जिल्ह्यातील स्विकृत नगरसेवकावर गोंदिया लाचलुचपत प्रतिबंधक...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या अहेरी नगरपंचायतीतील एका ४० वर्षीय स्विकृत नगरसेवकाने नगरोत्थान योजनेअंतर्गत मंजूर झालेल्या कामातील बिलाच्या रकमेच्या १५ टक्के मोबदला म्हणून ३ लाख...

प्रारूप मतदार यादीवरील दावे व हरकतींसाठी मुदतवाढ..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण कार्यक्रमांतर्गत(SIR)प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीवर दावे व हरकती दाखल करण्याची मुदत २६ ऑक्टोंबर २०२६ पर्यंत...

देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या वाहनाचा भीषण अपघात; तिघांचा मृत्यू,तिघेजण जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नांदेड :-जिल्ह्याच्या माहूर तालुक्यातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे.माहूर तालुक्यातील सह्याद्रीच्या पर्वतरांगांमध्ये डोंगरावर वसलेल्या रेणुका मातेच्या दर्शनासाठी गेलेल्या भाविकांच्या टेम्पोचा माहूर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!