Wednesday, August 12, 2026
Homeगडचिरोलीउद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट...

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे.या मोहिमेअंतर्गत ० ते ५ वर्षे वयोगटातील जिल्ह्यातील ८२ हजार ९८४ बालकांना पोलिओ प्रतिबंधक लसीचा डोस देण्याचे उद्दिष्ट निश्चित करण्यात आले असून,दुर्गम व अतिदुर्गम भागातील प्रत्येक बालकापर्यंत पोहोचण्यासाठी आरोग्य यंत्रणा पूर्ण क्षमतेने सज्ज झाली आहे.
गडचिरोली जिल्ह्याची लोकसंख्या सुमारे ११ लाख ४१ हजार १६५ असून प्रत्येक पात्र बालकापर्यंत लसीकरणाची सुविधा पोहोचावी यासाठी अत्यंत सूक्ष्म नियोजन करण्यात आले आहे.जिल्हा माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.माधव शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली संपूर्ण जिल्ह्यात २ हजार ३०८ पोलिओ लसीकरण केंद्रे(बूथ)उभारण्यात आली आहेत.
प्रवासादरम्यान किंवा दुर्गम भागातील बालके लसीकरणापासून वंचित राहू नयेत यासाठी १२३ ट्रान्झिट पथके बसस्थानके,रेल्वे स्थानके,तपासणी नाके व इतर गर्दीच्या ठिकाणी कार्यरत राहणार आहेत.तसेच दुर्गम पाडे,वाड्या-वस्त्यांपर्यंत पोहोचण्यासाठी ९८ मोबाईल (फिरती)पथके नियुक्त करण्यात आली आहेत.प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्रे,ग्रामपंचायत स्तरावरील लसीकरण केंद्रे,आशा स्वयंसेविका,अंगणवाडी सेविका आणि आरोग्य कर्मचारी यांच्या माध्यमातून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे.
या मोहिमेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाने सर्व पालकांना आपल्या ० ते ५ वर्षे वयोगटातील बालकाला उद्या रविवारी जवळच्या लसीकरण केंद्रावर नेऊन पोलिओचा डोस अवश्य देण्याचे आवाहन केले आहे.
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी नागरिकांना आवाहन करतांना म्हटले की, “लसीकरण हे बालकांच्या आरोग्याचे प्रभावी संरक्षण आहे.पोलिओसारख्या गंभीर आजारापासून कायमस्वरूपी बचाव करण्यासाठी प्रत्येक पात्र बालकाला पोलिओ डोस देणे अत्यंत आवश्यक आहे.या लोकहिताच्या मोहिमेत नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवावा.”
मुख्य कार्यकारी अधिकारी,जिल्हा परिषद गडचिरोली  सुहास गाडे यांनी सांगितले की, “पोलिओमुक्त भारत हे आपले राष्ट्रीय ध्येय आहे.या मोहिमेत एकही बालक लसीकरणापासून वंचित राहू नये,यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत.प्रत्येक पालकाने आपल्या बालकाला पोलिओचा डोस देऊन या मोहिमेत सक्रिय सहभाग नोंदवावा.”
जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.प्रताप शिंदे यांनी सांगितले की, “दुर्गम आणि अतिदुर्गम भागातील प्रत्येक बालकापर्यंत लस पोहोचावी यासाठी विशेष नियोजन करण्यात आले आहे.सर्व आरोग्य कर्मचारी, आशा स्वयंसेविका आणि अंगणवाडी सेविका आपल्या सेवेत तत्पर राहतील.पालकांनी कोणतीही शंका न बाळगता आपल्या बालकाला पोलिओचा डोस द्यावा.”
आरोग्य विभागाने सर्व पालकांना पुन्हा एकदा आवाहन केले आहे की,उद्या रविवार २८ जून २०२६ रोजी आपल्या परिसरातील जवळच्या पल्स पोलिओ लसीकरण केंद्रावर जाऊन ० ते ५ वर्षे वयोगटातील प्रत्येक बालकाला पोलिओचा डोस देऊन पोलिओमुक्त समाज घडविण्याच्या राष्ट्रीय अभियानात आपला सहभाग नोंदवावा.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी नवीन सेवार्थ प्रणाली लागू.. – ‘डेटा मायग्रेशन’ व पायलट वेतन देयक प्रक्रिया तात्काळ पूर्ण करण्याचे आवाहन.. – सुट्टीच्या दिवशीही कोषागार...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वेतनाची प्रक्रिया अधिक वेगवान,सुलभ आणि सुरक्षित करण्याच्या उद्देशाने राज्य शासनाच्या वित्त विभागाच्या १ जुलै २०२६ च्या शासन...

आता राष्ट्रीय गीत असलेल्या ‘वंदे मातरम्’ला कायदेशीर संरक्षण प्राप्त.. -कोणत्याही शासकीय कार्यक्रमात ‘वंदे मातरम्’ प्रथम गायले जाईल..

उद्रेक न्युज वृत्त :-देशाच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल मंगळवारी 'राष्ट्रीय प्रतिष्ठा अवमान निवारण (सुधारणा)विधेयक २०२६' ला मंजुरी दिल्याने आता राष्ट्रीय गीत असलेल्या 'वंदे मातरम्'ला...

नानाजी देशमुख कृषी संजीवनी योजनेअंतर्गत पिकांच्या पाण्याचा प्रश्न कायमचा सुटला.. – कुरखेडा तालुक्यातील शेतकऱ्याने सांगितला आनंददायक अनुभव..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :- "नानाजी देशमुख कृषी संजीवनी (पोकरा)योजनेअंतर्गत मी ३० पाईपची मागणी केली होती.पाईप खरेदी केल्यानंतर अवघ्या ८ दिवसांच्या आत माझ्या खात्यात ८०...

कारची ट्रकला मागून जोरदार धडक; दोन तरुणांचा जागीच मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत आज,बुधवार १२ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात दोन अल्पवयीन तरुणांचा जागीच मृत्यू झाला; तर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!