Thursday, August 27, 2026
Homeगडचिरोलीअवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात रेतीचे सहा खनिज डेपो कार्यान्वित.....

अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी गडचिरोली जिल्ह्यात रेतीचे सहा खनिज डेपो कार्यान्वित.. – चेकपोस्टवर हलगर्जीपणा केल्यास शिस्तभंगाची कारवाई..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-गडचिरोली जिल्ह्यातील खनिज उद्योग अधिक कार्यक्षम आणि नियमनबद्ध करण्याच्या दृष्टीने अवैध उत्खनन व वाहतूक रोखण्यासाठी गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी आज,गुरुवारी ६ मार्चला सहा खनिज डेपो कार्यान्वित केले आहे.या सहा डेपोच्या विक्री करारावर जिल्हाधिकारी पंडा यांनी एक महिनापूर्वी कार्यभार स्वीकारल्यानंतर स्वाक्षरी केली होती.आता गडचिरोली जिल्ह्यात सहा डेपो कार्यान्वित होणार आहेत.
गेल्या दोन महिन्यांपासून हे डेपो सुरु व्हावे,यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. आवश्यक मंजुरी,पायाभूत सुविधा आणि नियामक प्रक्रियांची पूर्तता करण्यासाठी प्रशासनाने मोठ्या प्रमाणावर प्रयत्न केले.या योजनेमुळे जिल्ह्यातील खनिज वाहतूक अधिक पारदर्शक होणार आहे.
नव्याने सुरु झालेले डेपो👇
आंबेशिवणी (ता.गडचिराेली),दुधमाळा (ता.धानोरा), वाघोली (ता.चामोर्शी),सावंगी,कुरुड (दोन्ही ता. देसाईगंज),देऊळगाव (ता.आरमोरी) या ठिकाणी डेपो सुरु करण्यास मंजुरी मिळाली आहे.
कोठे किती उत्खनन होणार👇
आंबेशिवणी डेपोमध्ये ७८९७ ब्रास रेतीचे उत्खनन करण्यास परवानगी मिळाली आहे,तसेच दुधमाळा येथे ३११० ब्रास,वाघोली २२७९२ ब्रास,सावंगी येथे १४१३४ ब्रास,कुरुड येथे १६५३७ ब्रास तर देऊळगाव येथे १९५२३ ब्रास रेती उपसा करता येणार आहे.
चेकपोस्ट निर्मिती,ईटीपी तपासणी बंधनकारक👇
जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांनी अवैध रेती वाहतूक व उत्खनाला आळा घालण्यासाठी चेकपोस्ट निर्मिती केली असून ईटीपी तपासणी देखील बंधनकारक केली आहे.चेकपोस्टवर हलगर्जी केल्यास शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. मंडळाधिकाऱ्यांना नियंत्रण अधिकारी म्हणून तर तहसीलदारांना नोडल अधिकारी म्हणून नियुक्ती केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!