Thursday, August 27, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तचारित्र्यहनन,अवमानजनक वक्तव्यांवर बंदी घालण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना- न्यायालय

चारित्र्यहनन,अवमानजनक वक्तव्यांवर बंदी घालण्याचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना- न्यायालय

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-पुणेच्या स्वारगेट आगारातील शिवशाही बसमध्ये आरोपी दत्तात्रेय रामदास गाडे वय ३६ वर्षे याने तरुणीवर अत्याचार केल्याची घटना २५ फेब्रुवारी रोजी घडली.या प्रकरणी स्वारगेट पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल असून,आरोपी दत्तात्रेय गाडेला न्यायालयाने १२ मार्चपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.अत्याचाराची घटना उघडकीस आल्यानंतर काही राजकारणी,पोलिस अधिकारी यांच्याकडून तरुणीच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी विधाने करण्यात आली होती.त्यामुळे तरुणीचे चारित्र्यहनन करणाऱ्या अवमानजनक,असंवेदनशील व दिशाभूल करणाऱ्या वक्तव्यांवर बंदी घालण्यासाठी प्रतिबंधात्मक आदेश न्यायालयाने द्यावा,असा अर्ज तरुणीचे वकील ॲड.असीम सरोदे यांनी केला होता.ॲड.सरोदे यांनी केलेल्या अर्जावर नुकतीच सुनावणी झाली होती.भारतीय नागरिक सुरक्षा संहितेच्या कलम १६३ नुसार,उपद्रव किंवा संभाव्य धोक्याच्या अथवा तातडीच्या प्रकरणांमध्ये राज्य सरकारने जिल्हाधिकारी,उपविभागीय दंडाधिकारी किंवा कार्यकारी दंडाधिकाऱ्यांना आदेश काढण्याचे विशेष अधिकार दिले आहेत.या न्यायालयाला असे अधिकार नाहीत.सर्वोच्च न्यायालयाच्या निवाड्याचे उदाहरण या प्रकरणी लागू होत नाही,असे नमूद करत न्यायालयाने तरुणीच्या वकिलांचा अर्ज फेटाळला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांसाठी संपर्क क्रमांक व ऑनलाइन नोंदणी लिंक जारी..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला आलेल्या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे.या पार्श्वभूमीवर नेपाळमध्ये अडकलेल्या गडचिरोली जिल्ह्यातील पर्यटकांनी अथवा त्यांच्याशी संपर्क...

विजेचा जोरदार धक्का लागल्याने कर्मचाऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-शेतशिवारातील विद्युत वाहिनीतील तांत्रिक बिघाड दूर करत असतांनाच अचानकपणे विजेचा जोरदार धक्का लागून विद्युत वितरण कंपनीत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू...

गडचिरोली जिल्ह्यातील सर्व पुलांचे स्ट्रक्चरल ऑडिट करण्याचे निर्देश.. -कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही- सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोंसले

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील रस्ते व पुलांची कामे उच्च प्रतीची,सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी झाली पाहिजेत.कामांच्या गुणवत्तेबाबत कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही.निकृष्ट अथवा सदोष...

धक्कादायक..! आई-वडीलांनी दोन मुलांना सोबत घेऊन धावत्या रेल्वे समोर मारली उडी.. – चौघांचा करून अंत..

उद्रेक न्युज वृत्त  जळगाव :-जिल्ह्याच्या अमळनेर तालुक्यातील टाकरखेडा येथे आज,गुरुवार २७ ऑगस्ट रोजी पहाटेच्या सुमारास एकाच कुटुंबातील चौघांनी धावत्या रेल्वे समोर उडी मारून सामूहिक आत्महत्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!