Sunday, July 12, 2026
Homeभंडाराटिप्परची दुचाकीला धडक; ११ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू तर दोघे जखमी..

टिप्परची दुचाकीला धडक; ११ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू तर दोघे जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील वरठी गावाजवळ दुचाकीला टिप्परने धडक देताच धडकेत दुचाकीवरील ११ वर्षीय मुलीचा जागीच मृत्यू झाला तर दुचाकी चालक व एक मुलगा जखमी झाला.सदरची घटना आज,गुरुवारी ६ मार्चला सायंकाळी ७ वाजेच्या दरम्यान घडली.
मोहाडी तालुक्याच्या वरठी गावावरून एकलारी हे गाव एक किलोमिटर अंतरावर आहे.अशातच
वरठी येथुन दुचाकी चालक बालु सेलोकर आपल्या लहान मुलीसह घराजवळच्या मुलाला ट्युशन वरून घरी एकलारी येथे जात असतांना वरठी येथील रेल्वे पुलावर भंडारा कडे जात असलेल्या भरधाव टिप्पर क्रमांक-एम एच ३६ ए जे १०१५ ने दुचाकीला धडक दिली.धडक इतकी जबर होती की,दुचाकीस्वार एकता बालु सेलोकर वय ११ वर्षे राहणार एकलारी,ता.मोहाडी,जि.भंडारा या मुलीचा जागीच मृत्यू झाला,तर दुचाकी चालक तिचे वडील बालु सेलोकर वय ४५ वर्षे व विर कन्हैया मारवाडे वय १२ वर्षे हा मुलगा गंभीर जखमी झाला.अपघातानंतर टिप्पर चालकाने घटनास्थळावरून पळ काढला. अपघातानंतर परिसरातील नागरिकांनी रोष व्यक्त करत गर्दी केली होती.बऱ्याच वेळानंतर पोलीस प्रशासनाने परिस्थितीवर नियंत्रण मिळवत मार्ग मोकळा केला.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

दोन दुचाक्या एकमेकींना धडकल्या; एकाचा घटनास्थळीच मृत्यू, तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  कुरखेडा(गडचिरोली):-दोन दुचाक्या समोरासमोर एकमेकींना धडकून घडलेल्या अपघातात एका दुचाकीस्वाराचा घटनास्थळावरच मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना आज,शनिवार ११ जुलै रोजी सायंकाळी सात...

दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना दणका; निलंबनासह विभागीय चौकशीचे आदेश..

उद्रेक न्युज वृत्त :-शासकीय कार्यालयात वारंवार गैरहजर राहणे,परवानगीशिवाय मुख्यालय सोडणे, आढावा बैठकांना अनुपस्थित राहणे,रजेचे अर्ज विहित नमुन्यात व वेळेत सादर न करणे,वरिष्ठांच्या आदेशांची अवहेलना...

देसाईगंजच्या विहीरगाव(पोटगाव)येथील ‘त्या’ मातेने रुग्णवाहिकेतच दिला गोंडस मुलीला जन्म..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज तालुक्याच्या विहीरगाव(पोटगाव)येथील रहिवासी स्वाती चांगदेव नेवारे ह्या माहेरी बाळंतपणासाठी गेल्या असता  आरोग्य केंद्रातून रुग्णवाहिकेद्वारे गोंदियाला रेफर करत असतांनाच काही अंतरावरील मार्गावर...

कुरुडच्या प्राथमिक आरोग्य केंद्रास आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या संचालकांची भेट..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील आरोग्य विभागाचे शासन स्तरावर प्रलंबित असलेले प्रस्ताव तातडीने मार्गी लावण्यात येतील,अशी ग्वाही आरोग्य सेवेचे आयुक्त तथा राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे संचालक...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!