- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या सावली वनपरिक्षेत्रांतर्गत येणाऱ्या पाथरी उपक्षेत्रातील कक्ष क्रमांक-२९८ मध्ये सोमवार,२३ मार्च २०२६ रोजी वाघाच्या मृतदेहाबाबत वन विभागास तक्रार प्राप्त झाली.तक्रारीची तात्काळ दखल घेत वनअधिकाऱ्यांनी दुपारी सुमारे १२ वाजता घटनास्थळी पाहणी केली असता,वाघाच्या शरीराचे काही अवयव कुजलेल्या अवस्थेत आढळले,तर काही अवयव घटनास्थळावरून गायब असल्याचे निदर्शनास आले. प्रकरणी चंद्रपूर वन वृत्ताचे मुख्य वनसंरक्षक आर.एम.रामानुजम यांच्या मार्गदर्शनाखाली विभागीय वनाधिकारी राजन तलमले यांच्या नेतृत्वात तपास सुरू असतांनाच कहाणीमध्ये ट्विस्ट आला.चक्क पोटच्या मुलाने बापाच्या रोजच्या किटकीटीपायी पोलीस ठाणे गाठले आणि चोर बापाचा भांडाच फोडला.आरोपी सुरेश सोनकर याच्या मुलाने पाथरी येथील पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली. लागलीच सदरची माहिती ही वन विभागास पोलिसांनी देताच प्रकरणाला वाचा फुटली. सुरेश सोनकर,दिवाकर सोनकर दोघेही रा.उसरपार चक,ता.सावली,जि.चंद्रपूर,गोंदियाचा शिशुपाल मेश्राम,तर गडचिरोली येथील विनोद गेडाम या चार आरोपींना वनकोठडी ठोठावण्यात आली आहे,तर आकाश दाजगाये,किशोर भोयर,बबलू शेंद्रे यांना संशयित म्हणून ताब्यात घेत चौकशी सुरू आहे.काल गुरुवारी आरोपींकडून वाघाचे दोन दात,एक नख,आठ मिशा आणि हाडे जप्त करण्यात आली असून सदरची कारवाई मुख्य वनसंरक्षक रामानुजन,विभागीय वनाधिकारी राजन तलमले यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक विकास तरसे, सावलीचे आरएफओ विनोद धुर्वे व त्यांच्या पथकाने केली.
- Advertisement -

