Monday, August 31, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तलाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; आजपासून फेब्रुवारी महिन्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू..

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी; आजपासून फेब्रुवारी महिन्याच्या वितरणाची प्रक्रिया सुरू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत मागील फेब्रुवारी महिन्याच्या प्रलंबित असलेल्या सन्मान निधी वितरणाची प्रक्रिया आज, शुक्रवार २७ मार्चपासून सुरू झाली असून राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदिती तटकरे यांनी ही घोषणा केली आहे.त्यामुळे पुढील दोन ते तीन दिवसांत सर्व पात्र लाभार्थी महिलांच्या आधार संलग्न खात्यात फेब्रुवारी महिन्याचे दीड हजार रुपये जमा होणार आहेत. तर काही महिलांच्या खात्यात आज पासूनच दीड हजार रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे.
मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा दीड रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाते.या माध्यमातून महिलांचे सशक्तीकरण साधण्याचा सरकारचा हेतू आहे.गत अनेक दिवसांपासून फेब्रुवारी महिन्याचा लाभ केव्हा मिळणार?असा सवाल महिला वर्गातून केला जात होता.त्यानुसार,आता फेब्रुवारीच्या निधी वितरणासाठी आवश्यक असलेली तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असल्याने रक्कम लाभार्थी महिलांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात झाली आहे. मंत्री अदिती तटकरे यांनी याविषयी आपल्या एका पोस्टमध्ये म्हटले की,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील सर्व पात्र लाभार्थ्यांना फेब्रुवारी महिन्याचा सन्मान निधी वितरित करण्याची तांत्रिक प्रक्रिया आजपासून सुरू करण्यात आली आहे.पुढील २-३ दिवसांत सर्व पात्र लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात हा सन्मान निधी जमा होणार आहे.महायुती सरकारचा दृढ निश्चय,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे,उपमुख्यमंत्री सुनेत्राकाकी पवार यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन व महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचा दृढ विश्वास या बळावर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेची दमदार वाटचाल यापुढेही अशीच सुरू राहणार हा मला विश्वास आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!