Monday, August 31, 2026
Homeगडचिरोलीअनियंत्रित कार धाडकन हवेत उडून झाली पटली.. - सुदैवाने जीवितहानी टळली..

अनियंत्रित कार धाडकन हवेत उडून झाली पटली.. – सुदैवाने जीवितहानी टळली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-भरधाव वेगात असलेली कार अनियंत्रित होऊन मार्गावरील कठडे तोडत एखाद्या चित्रपटातील दृश्याप्रमाणे धाडकन हवेत उडाली आणि मुख्य मार्गाच्या मध्यभागी पलटी झाल्याची घटना गुरुवारच्या मध्यरात्रीच्या सुमारास गडचिरोली शहरातील कारगील चौकात घडली.यात २२ वर्षीय कारचालक देव राहुल महात्मे हा जखमी होऊन वाहनाचे मोठे नुकसान झाले आहे.विशेष म्हणजे, मार्गावर शुकशुकाट असल्याने मोठी जीवितहानी टळली.
मध्यरात्रीच्या सुमारास देव महात्मे हा एकटाच त्याच्या कारने चंद्रपूर मार्गावरून गडचिरोली शहराकडे निघाला असतांनाच गडचिरोली शहरातील कारगील चौकात येताच त्याचे कारवरील नियंत्रण सुटले.अनियंत्रित झालेली कार सर्वप्रथम रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या कठड्यांना धडकली व नंतर दिशादर्शक फलकांना आदळली.धडक इतकी भीषण होती की कारचालक हा कारसह हवेत उडाला आणि कारगील स्मारकाजवळच पलटी झाली.अपघाताचा आवाज मोठ्याने झाल्याने स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमी चालकाला वाहनातून बाहेर काढले.सुदैवाने जीवितहानी टळली असली तरीही अतिवेग हा जीवावर बेतू शकतो.त्यामुळे वाहने हळू चालवणे गरजेचे आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!