Friday, October 16, 2026
Homeकुरखेडागरीब रुग्णाला लोकवर्गणीतून मदतीचा हात; माणुसकीचा जिवंत आदर्श..

गरीब रुग्णाला लोकवर्गणीतून मदतीचा हात; माणुसकीचा जिवंत आदर्श..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
कुरखेडा(गडचिरोली):-एका अत्यंत हलाखीच्या परिस्थितीत जगणाऱ्या कुरखेडा तालुक्याच्या आंधळी येथील भूमिहीन कुटुंबातील ज्ञानेश्वर उईके हा रुग्ण मागील चार वर्षांपासून गंभीर आजाराने त्रस्त होता. रोजंदारीवर उदरनिर्वाह करणाऱ्या या कुटुंबाची आर्थिक अवस्था इतकी बिकट होती की,आवश्यक ते वैद्यकीय उपचार घेणे त्यांच्यासाठी केवळ स्वप्नच बनले होते. आजारपण,गरिबी आणि असहाय्यताच्या कचाट्यात सापडलेल्या या कुटुंबाकडे कुणीही लक्ष देत नव्हते.या अत्यंत संवेदनशील परिस्थितीची दखल घेत समाजातील काही जागरूक व माणुसकी जपणाऱ्या व्यक्तींनी पुढाकार घेतला आणि “माणुसकी अजून जिवंत आहे” हे पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवले.माहिती अधिकार पत्रकार संरक्षण व पोलीस मित्र समितीचे जिल्हाध्यक्ष मनोज उराडे यांच्या मार्गदर्शनाखाली व आंधळी ग्रामपंचायतीचे माजी उपसरपंच तथा समितीचे तालुकाध्यक्ष अप्रव भैसारे यांच्या नेतृत्वात लोकवर्गणीच्या माध्यमातून रुग्णासाठी आर्थिक मदत उभी करण्यात आली.या उपक्रमात समाजसेवक जीवन नाट,चांगदेव फाये, विनोद खुणे,हेमंत सेंदरे,ग्रामसेवक कन्नाके,ग्रामसेविका डोंगरवार,देवीकर,लाडे(मुख्याध्यापक व कर्मचारी),भारत डोंगरे,गौरव रामटेके,गणेश भैसारे, सुरेंद्रसिंग गौतम तसेच आरोग्य उपकेंद्र विभागाच्या टीमने सक्रिय सहभाग नोंदवून मोलाचे सहकार्य केले. प्रत्येकाने आपल्या परीने दिलेल्या हातभारामुळे एक मोठी मदत उभी राहिली आणि अखेर ज्ञानेश्वर उईके यांना आवश्यक उपचारासाठी आर्थिक आधार मिळाला.विशेष म्हणजे,
गरजू,गरीब, भूमिहीन आणि दारिद्र्यरेषेखालील नागरिकांना केवळ आश्वासनांची नव्हे,तर ठोस कृतीची गरज आहे आणि हीच जाणीव या घटनेतून ठळकपणे समोर येते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कारची सायकलला जोरदार धडक; सायकलस्वाराचा मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-रात्रीच्या सुमारास सायकलने घरी परतणाऱ्या एका शेतकऱ्याला भरधाव कारने जोरदार धडक दिल्याने झालेल्या भीषण अपघातात सायकलस्वार शेतकऱ्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला,तर धडकेनंतर...

अंगणवाडी सेविका व मदतनीसांना मिळणार दिवाळीपूर्वीच दोन हजाराची भाऊबीज भेट..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील एकात्मिक बालविकास सेवा योजनेअंतर्गत कार्यरत अंगणवाडी सेविका व मदतनीसांसाठी आनंदाची बातमी असून या सर्वांना दिवाळीपूर्वीच भाऊबीज भेट म्हणून प्रत्येकी...

महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अर्ज करण्याचे आवाहन; राज्यात ५० लाखांहून अधिक अर्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-शेती व शेतीपूरक व्यवसायांमध्ये कार्यरत महिलांना शेतकरी म्हणून अधिकृत ओळख मिळवून देणाऱ्या महिला शेतकरी प्रमाणपत्रासाठी अधिकाधिक महिलांनी अर्ज करावेत,असे आवाहन आंतरराष्ट्रीय...

अखेर राज्यातील सर्व ग्राम रोजगार सेवकांच्या मानधन वितरणाचा मार्ग मोकळा..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत ग्राम पातळीवर काम करणाऱ्या ग्रामरोजगार सहायकांच्या मानधन वितरणाचा मार्ग अखेर मोकळा झाला असून राज्यातील सर्व...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!