Friday, September 25, 2026
Homeचंद्रपूरशेतकऱ्याचा जीव घेणाऱ्या वाघाच्या हालचालींवर वनविभागाची बारकाईने नजर..

शेतकऱ्याचा जीव घेणाऱ्या वाघाच्या हालचालींवर वनविभागाची बारकाईने नजर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-नुकतेच चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरी वनविभागाच्या तळोधी(बा.)वनपरिक्षेत्रांतर्गत गोविंदपूर उपक्षेत्रातील नागभीड तालुक्याच्या गिरगाव जंगल परिसरात वाघाच्या हल्ल्यात आत्माराम दसरू बोरकर वय ५२ वर्षे,रा.गिरगाव,ता.नागभीड या शेतकऱ्याचा मृत्यू झाला होता.सदरची घटना ही शुक्रवार १९ जून २०२६ रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आल्याने संपूर्ण परिसरात भीतीचे सावट पसरले आहे.अश्यातच वनविभागाने तातडीने पावले उचलत परिसरात कडक सतर्कता उपाययोजना सुरू केल्या आहेत.वाघाच्या हालचालींचा अचूक मागोवा घेण्यासाठी वनविभागाने जंगल परिसरात आठ ट्रॅप कॅमेरे आणि एक सीसीटीव्ही कॅमेरा बसविला आहे.या माध्यमातून वाघाच्या उपस्थितीची माहिती मिळवून त्याच्या हालचालींवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे.तसेच जंगलालगतच्या संवेदनशील भागांमध्ये विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत.वनपरिक्षेत्र अधिकारी ए.आर.कन्नमवार यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक,क्षेत्र सहाय्यक आणि वनमजूरांची पथके परिसरात सतत गस्त घालत आहेत. जंगल परिसर तसेच शेतशिवारात नागरिकांच्या सुरक्षेसाठी विशेष उपाययोजना करण्यात आल्या आहेत. वनविभागाने गावकऱ्यांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अखेर लाडक्या बहिणींचा ऑगस्ट महिन्याचा मार्ग मोकळा; खात्यात येणार दीड हजार..

उद्रेक न्युज वृत्त :-मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या ऑगस्ट महिन्याच्या प्रलंबित हप्त्याचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.विशेष म्हणजे,मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र लाभार्थी...

पुढील तीन तासात दोन जिल्ह्यात बरसणार जोरदार पाऊस; नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-उघडीप देणारा पाऊस कुठे जोरदार पडतो,तर कुठे एक थेंबही पडत नाही.निसर्गाचा लहरीपणा या वर्षी चांगलाच धडा शिकवायला लागल्याचे चित्र आहे.विशेष म्हणजे,काही...

निर्धारित ध्वनी मर्यादेचे उल्लंघन; डीजे मालक व गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांविरुद्ध गुन्हा दाखल.. – डीजे सह इतर साहित्य जप्त..

उद्रेक न्युज वृत्त  प्रशांत गेडाम  सिंदेवाही(चंद्रपूर):-चंद्रपूर जिल्ह्याच्या सिंदेवाही पोलीस स्टेशन हद्दीतील मौजा पवनपार येथील नवयुवक बाल गणेश मंडळाच्या गणेश विसर्जन मिरवणुकीत शासनाने प्रतिबंधित केलेल्या प्रेशर मिड(Pressure...

डुंबरसात्या आणण्यासाठी जंगल परिसरात गेलेल्या इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गावालगतच्या जंगल परिसरात 'डुंबरसात्या' म्हणजेच मशरूम आणण्यासाठी गेलेल्या एका ४५ वर्षीय इसमाचा वाघाच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना आज,गुरुवार २४ सप्टेंबर रोजी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!