- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
भंडारा :-हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजानुसार राज्याच्या विविध भागात कुठे जोरदार पाऊस तर कुठे मध्यम तथा हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात पावसाची उघडीप, त्याचबरोबर रात्रीच्या सुमारास जोरदार पाऊस हजेरी लावत आहे.अश्यातच काल शुक्रवारच्या रात्री भंडारा, गडचिरोली व इतर जिल्ह्यात पावसाने जोरदार हजेरी लावली.परिणामी,वैनगंगा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाल्याने गोसेखुर्द धरणातून होणाऱ्या पाण्याच्या विसर्गातही वाढ करण्यात आली आहे.आज,शनिवार २७ सप्टेंबरला सकाळच्या सुमारास गोसेखुर्द धरणाचे ९ दरवाजे अर्धा मीटरने सुरू करण्यात आले होते.तर आता सायंकाळच्या सुमारास आणखी सहा दरवाजे उघडण्यात आले आहेत.त्यानुसार आता धरणाच्या १५ दरवाज्यातून अर्धा मीटरने पाण्याचा येवा सुरू करण्यात आला असून त्यातून ६६ हजार ५६८ क्युसेक वेगाने पाण्याचा विसर्ग करण्यात येत आहे.तर,भंडारा ते चंद्रपूर जिल्ह्यातील ब्रम्हपुरीला जोडणाऱ्या मार्गावरील सावरला पुलावर पावसाचे पाणी असल्याने वाहतुकीसाठी हा मार्ग बंद करण्यात आला आहे.तर भंडारा ते कारधा असे दोन मार्ग सध्या वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. पुलावरून पाणी वाहत असतांना वाहन वा आवागमन करू नये,असे आवाहन आपत्ती व्यवस्थापन प्रशासनाच्या वतीने करण्यात आले आहे.
- Advertisement -

