Sunday, May 31, 2026
Homeचंद्रपूरविद्यार्थिनींशी गैरवर्तन करत असल्याची कुणकुण; साध्या वेशात शाळेत जाऊन चौकशी.. - शिक्षकाला...

विद्यार्थिनींशी गैरवर्तन करत असल्याची कुणकुण; साध्या वेशात शाळेत जाऊन चौकशी.. – शिक्षकाला पोक्सो अंतर्गत बेड्या..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-बऱ्याच कालावधीपासून शालेय विद्यार्थिनींशी अश्लीलतेचा कळस गाठणाऱ्या एका नराधम शिक्षकाला चंद्रपूर शहर पोलिसांनी अटक करून पोक्सो कायद्या अंतर्गत बेड्या ठोकल्या आहेत.चंद्रपूर शहर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील नामांकित कन्या विद्यालयातील एका ५१ वर्षीय शिक्षकाने विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना उघडकीस आली.विशेष म्हणजे,शाळेतील शिक्षक वर्गातील विद्यार्थिनींशी गैरवर्तन करत असल्याची कुणकुण शहर पोलिसांना लागली होती.प्रकरणी पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांनी प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेता याबाबत शाहनिशा करण्याकरीता एका महिला पोलिस कर्मचाऱ्यास साध्या वेशात शाळेत जाऊन चौकशी करण्याचे निर्देश दिले होते.त्यानुसार,काल शुक्रवारी प्राथमिक तपासात तथ्य आढळताच महिला व बालविकास विभाग आणि चाइल्डलाइनच्या मदतीने विद्यार्थिनींशी संवाद साधला.यावेळी एकापाठोपाठ एक अशा आठव्या वर्गातील सहा विद्यार्थिनींशी घृणास्पद कृत्ये केल्याची घटना समोर आली.वर्गात शिकवतांना मुलींकडे अत्यंत घाणेरड्या नजरेने पाहणे,शाबासकी देण्याच्या नावावर शरीराला अश्लील स्पर्श करणे,मांडीला हात लावणे आणि संगणक लॅबमध्ये एकट्या विद्यार्थिनीला बोलावून अश्लील चाळे करणे,असे कृत्य सुरू असल्याचे स्पष्ट होताच नराधम शिक्षकाला चंद्रपूर शहर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.गोवर्धन गोंडाणे वय ५१ वर्षे,रा.इंदिरानगर,चंद्रपूर असे अटकेतील आरोपीचे नाव असून शहर पोलिसांनी पोक्सो अंतर्गत  व भारतीय न्याय संहिता कलम ७४,७५ अन्वये गुन्हा दाखल करून अटक केली आहे.अटकेनंतर आरोपीस न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.सदरची कारवाई पोलिस अधीक्षक मुम्मका सुदर्शन यांच्या मार्गदर्शनात उपविभागीय पोलिस अधिकारी प्रमोद चौगुले,ठाणेदार निशिकांत रामटेके यांच्या नेतृत्वात पोलीस उपनिरीक्षक पल्लवी काकडे व तृप्ती खंडाईत आदींनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

तरुणाने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-एका ३६ वर्षीय विवाहित तरुणाने राहत्या घरीच गळफास घेऊन जीवनयात्रा संपवल्याची घटना आज,रविवार ३१ मे रोजी सकाळच्या सुमारास चंद्रपूर जिल्ह्याच्या वरोरा शहरातील...

विवाहित महिलेचा गळा चिरून हत्या करणारा आरोपी अटकेत.. – क्षुल्लकशा कारणावरून हत्या; बालपणापासून होते प्रेमप्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा तालुक्यातील वेकोलिच्या धोपटाळा कामगार वसाहतीत एका विवाहित महिलेची धारदार शस्त्राने गळा चिरून निघृण हत्या करण्यात आल्याची थरारक घटना शुक्रवार...

धानोरा व एटापल्ली तालुक्यात २० हजार धुररहित चुलींचे वितरण.. -दरवर्षी ४१ हजार टनांहून अधिक जळाऊ लाकडाची होणार बचत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शन व पुढाकारातून गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा व एटापल्ली या दुर्गम,आदिवासी तालुक्यांमध्ये राबविण्यात आलेल्या धुररहित चुल उपक्रमाला उल्लेखनीय...

चार दिवसांत उष्माघाताचे तब्बल १८ जण बळी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सध्या नवतपाचे दिवस सुरू आहेत.२५ मे २०२६ पासून सुरू झालेली सूर्याची दाहकता २ जून २०२६ पर्यंत राहणार आहे.अश्यातच भयंकर तापणाऱ्या नवतप्याने...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!