Sunday, August 30, 2026
Homeनागपूरक्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या आयोजनात जेवणावरून वाद; चार शिक्षक निलंबित..

क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या आयोजनात जेवणावरून वाद; चार शिक्षक निलंबित..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धेच्या आयोजनात जेवणावरून वाद घालणे चार शिक्षकांना चांगलेच महागात पडले आहे.विशेष म्हणजे,नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी दुसऱ्याच दिवशी शिक्षकांच्या निलंबनाचे आदेश दिले.निलंबित करण्यात आलेल्या शिक्षकांमध्ये हिंगणा पंचायत समितीअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तांडा येथील सहाय्यक शिक्षक मनोज मानकर, कामठी पंचायत समिती अंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा गुमथी येथील सहाय्यक शिक्षक चंद्रशेखर शिंदे,कामठी पं.स.अंतर्गत जि.प.प्राथमिक शाळा ऐकर्डीचे सहाय्यक शिक्षक रमेश चाकुलकर व जि.प.प्रा.शाळा खसाळा येथील सहा.शिक्षक मनीष पोराटे यांचा समावेश आहे.तर इखार नामक शिक्षकाला कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.
नागपूरच्या शासकीय कृषी महाविद्यालय परिसर व डॉ.बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय कन्व्हेंशन सेंटर येथे १७ ते १९ फेब्रुवारी दरम्यान जिल्हा परिषदेतील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धा पार पडल्या.दरम्यान, कर्मचाऱ्यांसाठी जेवणाची व्यवस्था करण्यात आली होती.परंतु,पाच शिक्षकांनी जेवणावरून गोंधळ घातल्याची बाब नागपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांच्या निदर्शनास आली.सदरचा प्रकार हा अशोभनीय असल्याने मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी तात्काळ चार शिक्षकांचे निलंबन केल्याने शिक्षण विभागात एकच खळबळ उडाली आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

पुष्पा स्टाईलने सागवान लाकूड तस्करीचा डाव.. – घेराबंदी घालताच तस्करांनी ठोकली धूम..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुनचा २०२१ मध्ये प्रदर्शित झालेला 'पुष्पा: द राईज' हा लोकप्रिय चित्रपट सर्वांच्याच लक्षात आहे.आंध्र प्रदेशच्या शेषाचलम जंगलातील लाल...

तब्बल बारा दिवसांपूर्वी आलेल्या धमकीच्या ‘ई-मेल’ ची धास्ती; उद्याला शाळांना सुट्टी..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर शहरातील तब्बल डझनहून अधिक नामांकित शाळांसह १९ ठिकाणे बॉम्बने उडवून देण्याच्या धमकीचा ई-मेल मंगळवार १८ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळच्या सुमारास...

तब्बल २५० हून अधिक गावांचा ‘कुष्ठभयमुक्त व भेदभावमुक्त ग्राम’ संकल्प.. – कुष्ठांतेयांच्या प्रतिष्ठेसाठी ग्रामसभेत सर्वानुमते ठराव पारित..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-कुष्ठरोगाविषयी असलेली भीती,गैरसमज, कलंक आणि सामाजिक भेदभाव दूर करून कुष्ठांतेयांना सन्मानाने व प्रतिष्ठेने जगता यावे,या उद्देशाने चंद्रपूर, गडचिरोली,गोंदिया,पालघर व नंदुरबार जिल्ह्यात...

विकृत मानसिकतेचा कळस; चिमुकल्या मुलीसोबत २५ वर्षीय तरुणाचे गैरवर्तन..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-काही विकृत मानसिकतेचा कळस गाठलेल्या पुरुषांना कायद्याचा धाक उरलेला नसल्याचे दिसून येत आहे.भोळ्या-भाबड्या चिमुकल्या मुलींना फुस लावून जाळ्यात ओढत कुठे अत्याचार...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!