- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या ब्रम्हपुरी तालुक्यातील आवळगाव येथील एक इसम वाघाच्या हल्ल्यात ठार झाल्याची घटना आज,शुक्रवारी ४ एप्रिल रोजी सकाळी १० च्या सुमारास आवळगाव शेत शिवारातील रुपचंद गीरडकर यांच्या शेतालगत उघडकीस आली.मनोहर सखाराम चौधरी वय अंदाजे ६० वर्षे रा.आवळगाव ता.ब्रम्हपुरी असे वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या इसमाचे नाव आहे.
सद्या ग्रामीण भागात मोहफुल वेचणीचा हंगाम सुरू आहे.अशातच आज शुक्रवारी सकाळच्या सुमारास मनोहर चौधरी हे शेत शिवारात आवळगाव बिटातील कक्ष क्रमांक-११३८ मध्ये मोहफुल गोळा करण्यासाठी गेले होते.मोहफुल गोळा करीत असतांनाच परिसरात दबा धरून बसलेल्या वाघाने अचानकपणे मनोहर यांचेवर हल्ला चढवून नरडीचा घोट घेतला.त्यातच त्यांचा मृत्यू झाला.परिसरात मोहफुल वेचणारे तसेच शेतावरील नागरिकांना माहिती होताच घटनास्थळी बघ्यांनी मोठी गर्दी केली व सदर घटनेची माहिती वन विभागास देण्यात आली.घटनास्थळी वनपरिक्षेत्र अधिकारी आर.डी.शेन्डे व मेंडकी पोलिस घटनास्थळी दाखल झाले.मृतदेहाचा पंचनामा करून ताब्यात घेतला.त्यानंतर शव उत्तरीय तपासणीसाठी पाठवण्यात आले.वनविभागाने मृतकाच्या कुटुंबीयाना तातडीची मदत म्हणून पन्नास हजाराची आर्थिक मदत केली आहे.घडलेल्या घटनेने परिसरातील ग्रामस्थ तथा शेतकरी धास्तावले असून तात्काळ वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी आवळगाव वासियांकडून केली जात आहे.
- Advertisement -

