- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
चंद्रपूर :-जिल्ह्याच्या राजुरा वनपरिक्षेत्राच्या
मूर्ती वनक्षेत्रातून गेलेल्या दक्षिण मध्य रेल्वेच्या बल्लारशाह-काजीपेठ रेल्वे मार्गावरील कक्ष क्रमांक-५९० मधील पोल क्रमांक १५२/२६ नजिक एका नर बिबट्याचा रेल्वेच्या धडकेत मृत्यू झाल्याची घटना उघडकीस आल्याने वन विभागात एकच खळबळ उडाली.मृत बिबट्या चार ते वर्षाचा असल्याचा दावा करण्यात आला आहे.काल शनिवारच्या दुपारी एक बिबट मृतावस्थेत आढळून आला.रेल्वेच्या धडकेत बिबट्याचा मृत्यू झाल्याची माहिती रेल्वे कर्मचाऱ्याने वनविभागास दिली.घटनेची माहिती मिळताच वन कर्मचारी, पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेत प्रत्यक्ष पाहणी केली.प्राथमिक अंदाजावरून,रेल्वेच्या जबर धडकेत बिबट्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली व तीव्र आघातामुळे निर्माण झालेल्या न्यूरोलॉजिकल शॉकमुळे त्याचा मृत्यू झाल्याचे स्पष्ट करण्यात आले.
शवविच्छेदनाची नियमानुसार प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर मृत बिबट्याचे शव मध्यवर्ती रोपवाटिका,सुमठाणा येथे नेण्यात आले.वनअधिकाऱ्यांच्या उपस्थितीत नियमानुसार मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले. रेल्वेच्या धडकेत वन्य प्राण्यांचा जीव जात असल्याने वन्यजीवप्रेमींकडून भविष्यात अशा दुर्घटना टाळण्यासाठी रेल्वे प्रशासन आणि वनविभागाने संयुक्तपणे ठोस व कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.
- Advertisement -

