Monday, September 21, 2026
Homeभंडारारेती डेपोंवर ड्रोनद्वारे पाळत; महसूल व खनिकर्म विभाग अलर्ट मोडवर..

रेती डेपोंवर ड्रोनद्वारे पाळत; महसूल व खनिकर्म विभाग अलर्ट मोडवर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर व मोहाडी तालुक्यात मोठ्या प्रमाणावर अवैध वाळू उपसा करून चेले- चपाटे आमचे कोणी वाकडे करूच शकत नाही; अशी बतावणी करून राजरोसपणे गौण खनिजाची चोरी करीत आहेत.त्यामुळे आमदार राजू कारेमोरे यांनी रेती चोरी प्रकरणाची लेखी तक्रार केल्याने भंडारा ते मुंबईपर्यंत महसूल व खनिकर्म विभाग अलर्ट मोडवर आला आहे.सध्या तुमसर व मोहाडी तालुका हा रेतीचा हॉटस्पॉट ठरला आहे.तुमसर व मोहाडी तालुक्यातील ११ शासकीय रेती डेपोंवर ड्रोनद्वारे पाळत ठेवण्यात येत आहे.सदरची कारवाई खनिकर्म विभागाच्या अधिकाऱ्यांनी केल्याची माहिती आहे.
तुमसर तालुक्यातील वैनगंगा व बावनथडी येथील नदी घाटात शासकीय रेती डेपो मंजूर करण्यात आले आहेत.मोहाडी तालुक्यातही काही शासकीय रेती घाटाला महसूल प्रशासनाने मंजुरी दिली आहे.अशातच तुमसर तालुक्यातील पांजरा,उमरवाडा, बाम्हनी,तामसवाडी, मांडवी व सोंड्या येथील रेती घाटावर ड्रोनने निगराणी करण्यात आली.असे असले तरी रेती डेपो होल्ड करुन ठेवलेल्या परिसरातुनच रेतीची मोठ्या प्रमाणात तस्करी होत असल्याची बाब समोर आली आहे.याकडेही लक्ष देणे गरजेचे आहे.तुमसर व मोहाडी तालुक्यातील रेती घाटातून रेतीची सर्रास चोरी होते अशा तक्रारी प्रशासनाला प्राप्त झाल्या आहेत.राज्याच्या शेवटच्या टोकावरील तुमसर व मोहाडी तालुका हा रेतीकरिता हॉटस्पॉट ठरला आहे.मुंबई मंत्रालयात या गंभीर बाबीची दखल घेण्यात आल्याची माहिती आहे.यावर आता कायमस्वरुपी तोडगा निघणार की ‘चलती का नाम गाडी’ होणार हे काही अवधीतच कळणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गडचिरोलीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी...

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या...

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!