- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-गतवर्षी केंद्र सरकारने सोन्याच्या आयात शुल्कात लक्षणीय ९ टक्के कपात केल्याने,आयात शुल्क १५ वरून ६ टक्क्यांवर आले होते.त्यामुळे सोने दर घटून ७५ हजारांवरून थेट ७० हजारांपेक्षा कमी प्रतितोळ्यावर आले होते.त्यामुळे सोन्याच्या दरांमध्ये फारशी वाढ न होता,दर आणखी कमी होतील,अशी ग्राहकांना अपेक्षा होती.मात्र, आंतरराष्ट्रीय स्तरावरील वाढत्या घडामोडींमुळे दर अल्पावधीतच पूर्वस्थितीत आले.पुढे डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हाती घेताच सोने दरातील तेजीने प्रचंड वेग धरल्याने,अवघ्या दोनच महिन्यांत सोने १० हजारांनी वधारले आहे.
सोने-चांदी हे मौल्यवान धातू स्वस्त होतील,ही ग्राहकांची अपेक्षा आता फोल ठरतांना दिसून येत आहे.सोने दराने सर्वकालीन उच्चांक गाठला असून, सोने प्रतितोळा ९० हजारांच्या पार गेले आहे.अवघ्या दोनच महिन्यांत सोने तब्बल १० हजारांनी वधारले असून,दरवाढीची गती बघता दसरा,दिवाळीअगोदरच सोने लाखाचा टप्पा गाठण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.दरम्यान,चांदी दरातही मोठी तेजी बघावयास मिळत आहे.चांदीने पुन्हा एकदा लाखाचा टप्पा पार केला असून,चांदी आता प्रतिकिलो एक लाख तीन हजार रुपयांवर पोहोचली आहे.गेल्या ५ मार्च रोजी चांदीचा दर ९८ हजार रुपये प्रतिकिलो इतका होता.
- Advertisement -

