Monday, September 21, 2026
Homeचंद्रपूरउभ्या ट्रकला बसची धडक; बसच्या कंडक्टरचा मृत्यू तर १२ प्रवासी जखमी..

उभ्या ट्रकला बसची धडक; बसच्या कंडक्टरचा मृत्यू तर १२ प्रवासी जखमी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-उभ्या ट्रकला भरधाव वेगाने येणाऱ्या बसने जोरदार धडक दिल्याने यात बसचा वाहक (कंडक्टर) जागीच गतप्राण झाला तर ११ ते १२ प्रवासी जखमी झाल्याची घटना शुक्रवारच्या रात्री १२.३० वाजे दरम्यान नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील पडोली येथील हायटेक फार्मसी कॉलेज समोर घडली.संदीप वनकर रा.नगीना भाग परिसर,चंद्रपूर असे अपघातात मृत्यू झालेल्या वाहकाचे नाव आहे तर जखमींपैकी ३ जणांची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे.
माहितीनुसार,रात्रीच्या सुमारास बस नागपूरवरून चंद्रपूरकडे येत होती.अशातच नागपूर-चंद्रपूर महामार्गावरील पडोली येथील हायटेक फार्मसी कॉलेज समोर नादुरुस्त ट्रक रस्त्याच्या कडेला उभा होता.त्यातच रात्री अंधार असल्याने बसची उभ्या ट्रकला जोरदार धडक बसली.धडक इतकी जोरदार होती की,अपघातात कंडक्टरचा(वाहकचा) जागीच  मृत्यू झाला.तर ११ ते १२ प्रवासी जखमी झाले. दरम्यान,रात्री जवळपास साडेबारा वाजताच्या सुमारास हा अपघात झाला.घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठत पुढील कारवाई सुरू केली आहे.अपघातातील सर्व जखमींना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. सदर प्रकरणाचा अधिक तपास पडोली पोलीस करीत आहेत.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

महाराष्ट्र शासनाच्या वतीने गडचिरोलीत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-गणेशोत्सवाचे औचित्य साधून महाराष्ट्र शासनाचा सांस्कृतिक कार्य विभाग,सांस्कृतिक कार्य संचालनालय आणि जिल्हा प्रशासन,गडचिरोली यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या,मंगळवार २२ सप्टेंबर २०२६ रोजी...

भरधाव ट्रकची कारला मागून जोरदार धडक; दोघांचा करुण अंत,तर पाच जण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या नागभीड तालुक्यातील कोरधा गावाजवळ एक अत्यंत भीषण अपघाताची घटना समोर आली आहे.गावाकडे परत निघालेल्या कुटुंबीयांच्या कारला भरधाव ट्रकने मागून जोरदार...

क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद; बेदम मारहाणीत बापाचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-अगदी क्षुल्लकशा कारणावरून बाप-लेकात वाद झाला खरी,पण रागाच्या भरात ३० वर्षीय मुलाने  वडिलांना काठीने बेदम मारहाण केल्याने मारहाणीत गंभीर जखमी झालेल्या...

चालकाचे कारवरील नियंत्रण सुटल्याने भीषण अपघात; तीन जणांचा मृत्यू,तर एकजण गंभीर जखमी..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-मुंबईतील कोस्टल मार्गावर आज,रविवार २०  सप्टेंबर रोजी पहाटेच्या सुमारास झालेल्या भीषण अपघातात तीन तरुणांचा मृत्यू झाला,तर एकजण गंभीर जखमी झाला.मरीन ड्राईव्हकडून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!