Tuesday, August 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तदहावी-बारावी परीक्षेचा निकाल १५ मे पूर्वी होणार जाहीर..

दहावी-बारावी परीक्षेचा निकाल १५ मे पूर्वी होणार जाहीर..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-सध्या दहावी-बारावी बोर्डाची परीक्षा सुरू असून बारावीच्या विद्यार्थ्यांचा माहिती तंत्रज्ञान (आयटी) विषयाचा पेपर तर दहावीच्या विद्यार्थ्यांचेही दोन पेपर बाकी आहेत.परीक्षा ही येत्या १७ मार्च रोजी संपणार आहे.तत्पूर्वी,ज्या विषयांचे पेपर झाले आहेत,अश्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी वेळेत व्हावी,यासाठी दररोज शाळेच्या वेळेत विषय शिक्षकाने किमान ३५ उत्तरपत्रिका तपासाव्यात,असे बोर्डाकडून सांगण्यात आले आहे.दुसरीकडे उत्तरपत्रिका तपासणीवर नेहमीप्रमाणे शिक्षक संघटनांचा बहिष्कार नसल्याने दहावी-बारावीच्या विद्यार्थ्यांचे निकाल १५ मेपूर्वीच जाहीर होतील,अशी माहिती बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
इयत्ता बारावीच्या विद्यार्थ्यांची ११ फेब्रुवारीपासून तर दहावीच्या विद्यार्थ्यांची २१ फेब्रुवारीपासून परीक्षा सुरू आहेत.परीक्षा नेहमीपेक्षा १० दिवस अगोदर सुरू झाल्याने निकाल देखील १५ मेपूर्वीच जाहीर केला जाणार आहे.त्याअनुषंगाने नागपूर,अमरावती, नाशिक,लातूर,पुणे,छत्रपती संभाजीनगर,मुंबई, कोल्हापूर व कोकण या विभागीय मंडळांकडून तपासलेल्या उत्तरपत्रिकांचा दररोज बोर्डाचे अधिकारी आढावा घेत आहेत.
औदुंबर उकिरडे,विभागीय सचिव,महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ,पुणे👇
बोर्ड परीक्षेच्या उत्तरपत्रिका घरी न घेऊन जाता शाळेच्या वेळेत त्या शाळेतच तपासणे अपेक्षित आहे. उत्तरपत्रिका घरी नेल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर चौकशीअंती संबंधित शिक्षकासह शाळेच्या मुख्याध्यापकावर कारवाई केली जाते.दरम्यान, वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली उत्तरपत्रिकांची तपासणी गतीने सुरू असून दोन्ही इयत्तांचे निकाल १५ मेपर्यंत जाहीर होतील,असे नियोजन आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे जातवैधता प्रमाणपत्र तयार करणे पडणार महागात..

उद्रेक न्युज वृत्त :-बरेचदा जातवैधता प्रमाणपत्र अर्थात कॉस्ट व्यालीडिटी सर्टिफिकेट बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनवून शासकीय योजनांचा लाभ मिळवणे,शासकीय नोकरी,अभियांत्रिकी प्रवेश व इतर...

महामार्गाच्या विस्तारासाठी सरकारने शेतकऱ्यांना भूमिहीन करू नये- विजय वडेट्टीवार

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारा,गोंदिया,गडचिरोली आणि चंद्रपूरपर्यंत करण्यासाठी सुरू असलेल्या भूसंपादनात व सुपिक जमीन घेण्यासाठी प्रशासनाकडून बळजबरी केली जात असल्याचा आरोप...

गडचिरोली जिल्ह्याला ४८ आधार नोंदणी संच प्राप्त; इच्छुक सेवा केंद्र चालकांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात आधार नोंदणी व बायोमेट्रिक अद्ययावतीकरणाच्या सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी इच्छुक आपले सरकार सेवा केंद्र...

आता “पोलीस पाटी” अथवा “पोलीस” नाव लिहिलेल्या खासगी वाहनांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील बरेचसे पोलीस अधिकारी व कर्मचारी त्यांच्या खासगी दुचाकी वा चारचाकी वाहनांवर 'पोलीस' असे लाल अक्षरात लिहिणे किंवा तशी पाटी लावून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!