उद्रेक न्युज वृत्त
पुणे :- ‘यू- डायस प्लस’ पोर्टलमध्ये पटसंख्येच्या तुलनेत विद्यार्थी,शिक्षकांची माहिती भरलेली नाही, अशा राज्यातील शेकडो शिक्षकांना नोटिसा बजावण्यात आल्या आहे.शासनाने यू-डायस प्रणालीमध्ये शाळांबाबत माहिती भरण्याच्या सूचना देऊनसुद्धा त्याकडे दुर्लक्ष केल्याने तुमचे पगार का रोखू नये ? असे नोटीसमध्ये म्हटले आहे.यू-डायस प्लस प्रणालीमधून प्राप्त होणाऱ्या माहितीच्या आधारे केंद्र सरकार समग्र शिक्षा योजनेचे वार्षिक नियोजन व अंदाजपत्रक,राष्ट्रीय शैक्षणिक धोरण २०२०, राज्यनिहाय शैक्षणिक निर्देशांक, नॅशनल अचिव्हमेंट सर्व्हे,स्कूल एज्युकेशन क्वालिटी एज्युकेशन इंडेक्स निर्देशांकांची प्रभावीपणे अंमलबजावणी व नियंत्रण करण्याचे नियोजन करणार आहे.त्यासाठीच राज्यातील पूर्व प्राथमिक ते बारावीपर्यंत शिक्षण देणाऱ्या शाळांची माहिती ‘यू-डायस प्लस’ प्रणालीमध्ये टप्याटप्याने भरण्याची सूचना दिली होती.मात्र,अनेक शाळांनी ही माहिती भरण्यास टाळाटाळ केल्याने शिक्षण विभागाने शिक्षकांना नोटिसा बजावण्याचा धडाका सुरू केला आहे.
जयश्री चव्हाण,शिक्षणाधिकारी 👇
काही शाळांनी ‘यू-डायस प्लस’ प्रणालीमध्ये शाळेच्या पटसंख्येच्या तुलनेत मुलांची संख्या कमी नोंदवली आहे.शासनाने वारंवार भरविलेल्या ‘यू-डायस’ शिबिराला एकही दिवस उपस्थिती दर्शवली नाही. या शाळांमधील विद्यार्थ्यांची आधार नोंदणी कमी आहे. संबंधित शाळा अजिबात प्रतिसाद देत नसल्याने शाळांसह शिक्षकांना पगार रोखण्याबाबत नोटिसा बजावल्या आहेत.

