Sunday, September 6, 2026
Homeपुणेदुचाकीला हायवा ट्रकची धडक; वडिलांसह दोन चिमुकलींचा मृत्यू..

दुचाकीला हायवा ट्रकची धडक; वडिलांसह दोन चिमुकलींचा मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
पुणे :-दोन मुलींना घेऊन जात असलेल्या वडिलांच्या दुचाकीला एका हायवा ट्रकने धडक दिल्याने दुचाकी ट्रकच्या खाली येऊन चिमुकल्यांच्या वडिलांचा जागेवरच मृत्यू झाला,तर दोन मुलींचा रुग्णालयात नेत असतांना वातेच मृत्यू झाल्याची हृदयाला चटका लावणारी घटना आज,रविवार २७ जुलै रोजी पुणे जिल्ह्याच्या बारामती शहरात दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली. अपघातात राजेंद्र आचार्य आणि त्यांच्या दोन मुली, सई वय ११ वर्षे आणि मधुरा वय ५ वर्षे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला.घटनेने बारामती शहरात शोककळा पसरली आहे.
ओंकार आचार्य हे आपल्या दोन्ही मुलींसह एमएच ४२ बी ४८४४ क्रमांकाच्या दुचाकीवरून शहराच्या खंडोबानगर चौकातून जात होते.त्याचवेळी वेगाने येणाऱ्या एमएच १६ सी ए०२१२ क्रमांकाच्या एका हायवा ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.
धडकेत तिघेही हायवा ट्रकच्या मागील चाकाखाली सापडल्याने ओंकार यांचा जागीच मृत्यू झाला,तर सई आणि मधुरा यांना तातडीने सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र,उपचारापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला.पोलिसांनी हायवा ट्रक चालकाला ताब्यात घेत तपास सुरू केला आहे.घटना घडताच नागरिकांनी घटनास्थळी दाखल होत एकच गर्दी केली.मृतदेहांचे हृदयद्रावक दृश्य पाहून अनेकांच्या डोळ्यातील अश्रू अनावर झाले.पोलिसांनी तातडीने कारवाई करत मृतदेह शव विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवले.घटनेने आचार्य कुटुंबीयांवर दुखाचा डोंगर कोसळला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!