- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त
पुणे :-दोन मुलींना घेऊन जात असलेल्या वडिलांच्या दुचाकीला एका हायवा ट्रकने धडक दिल्याने दुचाकी ट्रकच्या खाली येऊन वडिलांचा जागेवरच मृत्यू झाला,तर दोन मुलींचा रुग्णालयात नेत असतांना वातेच मृत्यू झाल्याची हृदयाला चटका लावणारी घटना काल रविवार २७ जुलै रोजी पुणे जिल्ह्याच्या बारामती शहरात दुपारी बारा वाजताच्या सुमारास घडली होती.अपघातात ओंकार राजेंद्र आचार्य आणि त्यांच्या दोन मुली,सई वय ११ वर्षे आणि मधुरा वय ५ वर्षे यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता.ओंकार आचार्य हे आपल्या दोन्ही मुलींसह एमएच ४२ बी ४८४४ क्रमांकाच्या दुचाकीवरून शहराच्या खंडोबानगर चौकातून जात होते.त्याचवेळी वेगाने येणाऱ्या एमएच १६ सी ए०२१२ क्रमांकाच्या एका हायवा ट्रकने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली.धडकेत तिघेही हायवा ट्रकच्या मागील चाकाखाली सापडल्याने ओंकार यांचा जागीच मृत्यू झाला,तर सई आणि मधुरा यांना तातडीने सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयात दाखल करण्यात आले.मात्र, उपचारापूर्वीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला होता. अश्यातच मयत ओंकार यांचे वडील राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांनी काल झालेल्या अपघातात मुलगा व दोन नातीन यांचे तिन्ही मृतदेह पाहून एकच हंबरडा फोडला.दरम्यान,या घटनेचा धक्का सहन न झाल्याने राजेंद्र श्रीनिवास आचार्य यांचेही आज, सोमवार २८ जुलै रोजी निधन झाले.ते सेवानिवृत्त शिक्षक होते.आचार्य कुटुंबीय बारामती शहरातील खंडोबा नगर परिसरात वास्तव्यास असून एकाच वेळी चौघांच्या मृत्यूने संपूर्ण शहरवासीय शोकसागरात बुडाले.
- Advertisement -

