Sunday, April 19, 2026
Homeपुणेआता 'या' तरुणीला म्हणावे तरी काय? चक्क बॉयफ्रेण्डलाच बनवले कुरियर डिलिव्हरी बॉय...

आता ‘या’ तरुणीला म्हणावे तरी काय? चक्क बॉयफ्रेण्डलाच बनवले कुरियर डिलिव्हरी बॉय अन् बलात्काराचा केला बनाव.. -कल्पना नसलेल्या तरुणाला पोलिसांनी उचलले लग्नसोहळ्यातून..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

पुणे :-आजकाल कोण कुठल्या स्तराला जाऊन पोहचेल हे सांगताच येत नाही.पूर्वी तंत्रज्ञाणाअभावी काही प्रकरणे प्रलंबित राहून फायली बंद केल्या जायच्या.मात्र,हळूहळू तंत्रज्ञानाने उंच भरारी घेत काही कालावधीतच प्रकरणांचा उलगडा केला जातो आहे.अश्यातच एका सुशिक्षित तरुणीने अशोभनीय कृत्य केल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे.तिला वाटले की,आपण रचलेली कथित कहाणी कुणालाही कळणार नाही,पण शेवटी भांडा फुटला आणि शरमेने मान खाली घालावी लागल्याची घटना पुण्यात उघडकीस आली.पुण्याच्या कल्याणीनगर येथील आयटी कंपनीत असलेली २५ वर्षीय तरुणी दोन वर्षापासून कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत भावासोबत राहते.बुधवारी कुरियर डिलिव्हरी बॉय म्हणून आलेल्या तरुणाने घरात घुसून आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार तरुणीने दिली होती.त्यामुळे मोठ्या प्रमाणावर बातम्या तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याच्या पूर्वसंध्येला सदरची घटना उघड झाल्याने  दबावाखाली असलेल्या पोलिसांनी पुण्यापासून दिल्लीपर्यंत तब्बल दोनशे पोलिसांचा फौजफाटा तपासकामी लावला होता.शेकडो सीसीटीव्ही फुटेज, हजारो कॉल रेकॉर्डस तपासले.सर्व कुरिअर कंपन्यांशी संपर्क करून त्यांच्याकडे कामाला असलेल्या मुलांची माहिती मिळवली.विशेष म्हणजे,सर्वत्र खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणातील आरोपी आपणच आहोत याचा तरुणीचा बॉयफ्रेण्ड असलेल्या तरुणाला पत्ताच नव्हता.गुरुवारी नेहमीप्रमाणे त्याने बाणेरमधील आपल्या ऑफीसमध्ये काम केले.नात्यातील एक लग्न असल्याने शुक्रवारी तो तिकडे गेला होता.पोलिसांनी या लग्नसोहळ्यातून त्याला ताब्यात घेतले आणि घडलेल्या प्रकाराचा उलगडा झाला.घटनेच्या दिवशी बुधवारी तिचा भाऊ परगावी गेला होता.सायंकाळी साडेसातच्या सुमारास तरुणी एकटीच फ्लॅटवर होती. त्यामुळे तिला भेटण्यासाठी तरुण आला होता. त्यावेळी शारिरीक संबंध ठेवण्यावरुन दोघांमध्ये वाद झाला.मुलाने संबंधाची इच्छा व्यक्त केली.मासिक पाळीचे कारण देत तरुणीने नकार दिला.मात्र,तरुणाने तिच्यावर बळजबरी केली.त्यातून दोघांमध्ये वाद झाला आणि तरुणीने पोलीस ठाणे गाठत डिलिव्हरी बॉयकडून अतिप्रसंग झाल्याची स्टोरी रंगवली.मात्र, पोलिसांनी तरुणाला अटक केल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला.महत्वाचे म्हणजे, दोघांच्याही कुटुंबीयांचा परस्परांशी परिचय आहे.या दोघांत एक-दीड वर्षापासून गेटवर सिक्यूरिटी गार्डकडे कुरियर बॉय म्हणून तो नोंदणी करायचा.गार्डने खातरजमा करण्यासाठी फोन केल्यावर तरुणीही दुजोरा द्यायची. घरच्यांना कळू नये म्हणून दोघांनी लढवलेली ही शक्कल होती.तरुणीने पोलिसांत तक्रार देण्याआधी मोबाईल,लॅपटॉपमधील तरुणाशी संबंधित डेटाही डिलीट केला होता.मासिक पाळीचे कारण देत तरुणीने शरीरसंबंधास नकार दिल्यानंतरही तरुणाने बळजबरी केल्यामुळे तिने हे सगळे नाट्य रचल्याचे आता स्पष्ट झाले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाहनधारकांसाठी दिलासा; गडचिरोली शहरातील ट्रॅफिक सिग्नल काही वेळासाठी राहणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-विदर्भातीलच नव्हे तर राज्याच्या विविध जिल्ह्यात उकाड्याने नागरिक हैराण झाले आहेत. सकाळपासूनच उन्हाची तीव्रता वाढत चालल्याने जीवाची लाहीलाही होत आहे.अश्यातच शहरातील महत्त्वाच्या...

उष्णतेची तीव्रता; प्रखर उन्हामुळे शेतातच पडली बेशुद्ध.. – शेतकरी महिलेचा मृत्यू; नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्याच्या विविध भागात उष्णतेचा पारा चढल्याने आरोग्य विभागासह प्रशासन सतर्क झाले आहे.त्यातच,नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आहे.विशेष म्हणजे,दुपारी १२...

कहाणीमध्ये ट्विस्ट.! ना वाघ ना बिबट्या; घातपाताचा संशय.. – जंगल परिसरात महिलेचा मृतदेह आढळल्याचे प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  भंडारा :-जिल्ह्याच्या तुमसर वनपरिक्षेत्राच्या हरदोली सहवनक्षेत्रातील ३३६ कक्ष क्रमांकाच्या सोनेगाव बीट एकमध्ये बिबट्याने मोहफुले वेचत असणाऱ्या महिलेच्या मानेवर हल्ला चढवून ठार केल्याची...

पोलिसांच्या एका चुकीमुळे गडचिरोली हत्या प्रकरणातील ‘त्या’ आरोपीस मिळाला जामीन..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-सात वर्षावरील गुन्हे दाखल असलेल्या आरोपीस पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याला चोवीस तासांच्या आत न्यायालयातील न्याय दंडाधिकारी यांच्या समक्ष हजर करावे लागते.त्यानुसार,न्यायालय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!