Wednesday, June 24, 2026
Homeनागपूरपती समोरच पत्नीने पुलावरून नदीत उडी घेतली अन् क्षणात पाण्यात दिसेनाशी झाली..

पती समोरच पत्नीने पुलावरून नदीत उडी घेतली अन् क्षणात पाण्यात दिसेनाशी झाली..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-गावी जाण्यासाठी घरून निघालेले पती-पत्नी दोघेही मोठ्या आनंदात होते.घरातील देवाऱ्यापुढे असलेली फुले व इतर पूजेचे साहित्य नदीत फेकून देण्यासाठी वाटेत असणाऱ्या नदीच्या पुलावर काहीकाळ थांबले व दोघांनीही सेल्फी काढत  काही फोटो घेतले.त्याचवेळी पत्नीने अचानकपणे पुलावरून नदीत उडी घेतली आणि क्षणात पाण्यात दिसेनाशी झाली.सर्व काही अचानक घडल्याने पतीने  आरडाओरड करत नदीच्या दिशेने धाव घेतली. आजूबाजूच्या लोकांनी गर्दी केली,मात्र तोपर्यंत पत्नीचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही.सुखी संसाराची स्वप्ने रंगवू पाहणाऱ्या कुटुंबात क्षणात सर्वत्र दुःखाचे सावट पसरल्याची मन हेलावणारी घटना काल,शनिवारी दुपारी चारच्या सुमारास नागपूर जिल्ह्याच्या कामठी तालुक्यातील नेरी शिवारातील कन्हान नदीच्या पुलावर घडली.
याबाबत अधिक माहिती अशी की,ज्ञानेश्वरी विजय साकोरे वय २४,रा.काचूरवाही,ता.रामटेक,जि.नागपूर ही विजय साकोरे पतीसोबत नागपूरहून मूळगावी काचूरवाही येथे जात असतांना वाटेत पडणाऱ्या
नेरी येथील कन्हान नदी पुलावर दोघेही थांबले.देवाला अर्पण केलेल्या वस्तू विसर्जनासाठी थांबले असतांना दोघांनी सेल्फी काढली व काही फोटो घेतले.त्याचवेळी ज्ञानेश्वरीने अचानक पुलावरून नदीत उडी घेतली आणि क्षणात पाण्यात दिसेनाशी झाली.सर्व काही अचानक घडल्याने पती विजय साकोरेने आरडाओरड करत नदीच्या दिशेने धाव घेतली.आजूबाजूच्या लोकांनी गर्दी केली,मात्र तोपर्यंत ज्ञानेश्वरीचा काहीही थांगपत्ता लागला नव्हता.घटनेची माहिती मिळताच कन्हान पोलिस ठाण्याच्या ठाणेदार वैजयंती मांडवधरे व पोलिस उपनिरीक्षक राहुल चव्हाण आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले.कामठी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक महेश आंधळे आणि पोलिस उपनिरीक्षक मनीषा जाधव यांनीही शोधकार्यात सहभाग घेतला.स्थानिक पोहणाऱ्यांच्या मदतीने नदीत शोध घेण्यात आला,मात्र सायंकाळी अंधार पडल्यामुळे शोधकार्य थांबवावे लागले. ज्ञानेश्वरीचे माहेर भूगाव,ता.कामठी येथे असून नातेवाईक व गावकरी घटनास्थळी तातडीने दाखल झाले.महिलांचा हंबरडा व वृद्धांचा विलाप पाहून उपस्थितांचे मन हेलावले. घटनास्थळी रात्रीपर्यंत शोधकार्य सुरू होते,मात्र महिला सापडलेली नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

कोंढाळा ग्रामपंचायतीच्या वतीने जागतिक “एकल महिला दिन” साजरा..

उद्रेक न्युज वृत्त  कोंढाळा(गडचिरोली):- कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे म्हणजेच एखाद्या महिलेच्या पतीचे निधन झाल्यास एकटेपणाच्या काळात महिलांना सहन करावा लागणारा सामाजिक,आर्थिक व इतर त्रास किती चटके लावणारा असतो;...

कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे स्थापन होणार नवीन अप्पर तहसील कार्यालय.. – नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना नोंदविण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्याच्या मालेवाडा येथे नवीन अप्पर तहसील कार्यालय स्थापन करण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन असून,याबाबत नागरिक,ग्रामपंचायती आणि संस्थांकडून हरकती व सूचना...

उमेद अंतर्गत तयार होणाऱ्या उत्पादनांना मिळणार एकसंध ओळख.. – ‘गडचिरोली ब्रँड’साठी लोगो व टॅगलाईन पाठवा अन् जिंका ३० हजार रुपयांची बक्षिसे..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान(उमेद)अंतर्गत स्वयं सहाय्यता समूह (SHG), उत्पादक गट(PG)आणि महिला शेतकरी उत्पादक कंपन्यांकडून (FPO)तयार करण्यात येणाऱ्या विविध उत्पादनांना एकसंध...

शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाकडून दखल.. – तीन प्रगतशील शेतकऱ्यांना ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी पुरस्कार’ जाहीर..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील तीन प्रगतशील शेतकऱ्यांच्या उल्लेखनीय कृषी कार्याची राज्य शासनाने दखल घेत सन २०२३-२४ व २०२४-२५ या वर्षांसाठीचा प्रतिष्ठेचा 'वसंतराव नाईक शेतीनिष्ठ...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!