Sunday, September 6, 2026
Homeपुणेदिशाभूल करून खोटी माहिती दिल्याप्रकरणी तरुणीविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद.. - बलात्काराचा...

दिशाभूल करून खोटी माहिती दिल्याप्रकरणी तरुणीविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद.. – बलात्काराचा बनाव केलेले प्रकरण अंगलट..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

पुणे :-पुण्याच्या कल्याणीनगर येथील आयटी कंपनीत असलेल्या एका २५ वर्षीय तरुणीने कुरियर डिलिव्हरी बॉयने आपल्यावर घरात घुसून बलात्कार केल्याचा बनाव बुधवार २ जुलै रोजी केला होता. तरुणी गेल्या दोन वर्षापासून पुण्याच्या कोंढव्यातील एका उच्चभ्रू सोसायटीत भावासोबत राहते.बुधवारी २ जुलै रोजी कुरियर डिलिव्हरी बॉय म्हणून आलेल्या तरुणाने घरात घुसून आपल्यावर बलात्कार केल्याची तक्रार तरुणीने पोलिसांना दिली होती.पोलिसांत तक्रार देण्याआधी तरुणीने आपल्या मोबाईल, लॅपटॉपमधील तरुणाशी संबंधित डेटाही डिलीट केला होता.मोठ्या प्रमाणावर बातम्या तसेच केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या पुणे दौऱ्याच्या पूर्वसंध्येला सदरची घटना उघड झाल्याने दबावाखाली असलेल्या पोलिसांनी पुण्यापासून दिल्लीपर्यंत तब्बल दोनशे पोलिसांचा फौजफाटा तपासकामी लावला होता. शेकडो सीसीटीव्ही फुटेज,हजारो कॉल रेकॉर्डस तपासले.सर्व कुरिअर कंपन्यांशी संपर्क करून त्यांच्याकडे कामाला असलेल्या मुलांची माहिती मिळवली.

  • बॉयफ्रेण्डला माहितीच नव्हती👇
विशेष म्हणजे,सर्वत्र खळबळ उडवून देणाऱ्या या प्रकरणातील आरोपी आपणच आहोत याचा तरुणीचा बॉयफ्रेण्ड असलेल्या तरुणाला पत्ताच नव्हता.गुरुवारी ३ जुलै रोजी नेहमीप्रमाणे त्याने बाणेरमधील आपल्या ऑफीसमध्ये काम केले.नात्यातील एक लग्न असल्याने शुक्रवारी ४ जुलै रोजी तो तिकडे गेला होता.पोलिसांनी या लग्नसोहळ्यातून त्याला ताब्यात घेतले तेव्हा त्याला कळले की आपल्यावर गुन्हा दाखल झालाय आणि घडलेला प्रकार लक्षात आला.पोलिसांनी तरुणाला अटक केल्यानंतर धक्कादायक प्रकार समोर आला.तरुणीने पोलिसांना दिलेली माहिती संपूर्णपणे खोटी,दिशाभूल करणारी,नाहक त्रास व पोलिसांचा वेळ घालवणारी ठरली.त्यामुळे पोलिसांनी बलात्काराचा बनाव व दिशाभूल करून खोटी माहिती दिल्याप्रकरणी  तरुणीविरोधात अदखलपात्र गुन्ह्या दाखल केला आहे.
  • डॉ.राजकुमार शिंदे,पोलिस उपायुक्त,पुणे👇
पोलिसांची दिशाभूल करून खोटी माहिती दिल्याप्रकरणी या तरुणीविरोधात पोलिसांनी अदखलपात्र गुन्ह्याची नोंद केली आहे.न्यायालयाच्या परवानगीनंतर पुढील तपास करण्यात येणार आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता कांद्यानेही आणले सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी..

उद्रेक न्युज वृत्त :-बऱ्याच दिवसांपासून पांढऱ्या कांद्यानी सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणलेले असतांनाच आता लाल कांद्यानेही भाव खाऊन  सर्वसामान्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे.हल्ली विविध शहरांच्या...

तलावात मासे पकडत असतांनाच पाय घसरल्याने तलावात पडला; चिमुकल्याचा तलावात बुडून मृत्यू.. -दुसऱ्या घटनेत भारतीय सैन्य दलातील जवानाचा पाण्यात बुडून मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील निलज गावातून एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. शाळेला सुट्टी असल्याने मित्रांसोबत गाव नजीकच्या तलावात मासे पकडण्यासाठी गेलेल्या...

गांजाची वाहतूक; तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त,दोघेजण अटकेत..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-जिल्ह्याच्या बल्लारपूर-बामणी मार्गावर सापळा रचून पोलिसांनी ओडिशातून आणलेला तब्बल ५ किलो ७४९ ग्रॅम गांजा जप्त केला.कारवाईत दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले...

शिक्षक दिन व शिष्यवृत्ती पात्र विद्यार्थ्यांचा गुणगौरव सोहळा उत्साहात.. -शिष्यवृत्ती परीक्षेत देसाईगंज नगर परिषद शाळेचे १४ विद्यार्थी पात्र..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-शिक्षकांच्या कार्याचा गौरव आणि विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेला प्रोत्साहन देणारा प्रेरणादायी सोहळा आज,शनिवार ५ सप्टेंबर रोजी नगर परिषद देसाईगंजच्या वतीने शिक्षक दिनानिमित्त उत्साहपूर्ण वातावरणात...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!