Wednesday, July 29, 2026
Homeगडचिरोलीनक्षल्यांनी क्रूरपणे हत्या केलेल्या कुटुंबीयांतील सदस्यांना मिळाली पोलिसांत नोकरी..

नक्षल्यांनी क्रूरपणे हत्या केलेल्या कुटुंबीयांतील सदस्यांना मिळाली पोलिसांत नोकरी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस गडचिरोली दौऱ्यावर होते.मुख्यमंत्र्यांच्या हस्ते काल मंगळवारी विविध प्रकल्पांचे उद्घाटन व भूमिपूजन पार पडले.प्रसंगी मुख्यमंत्र्यांनी विविध आवाहन करत
माओवादग्रस्त जिल्ह्याची ओळख पुसली जात असल्याचे सांगत,हा बदल माओवाद्यांनी हिंसाचाराचा मार्ग सोडून संविधान स्वीकारल्यामुळेच शक्य झाल्याचे म्हणाले.त्यांनी उर्वरित माओवाद्यांना शस्त्रे खाली ठेवून संविधानाचा स्वीकार करत मुख्य प्रवाहात येण्याचे आवाहन केले.बंदुकीचा माओवाद संपत असला तरी ‘शहरी माओवादा’ पासून सावध राहण्याचेही आवाहन त्यांनी केले.”गडचिरोलीचा विकास सुरू झाला असतांना ‘आदिवासींच्या जमिनी हिसकावल्या’, ‘मोठ्या प्रमाणात जंगलतोड’ अशा अफवा पसरविण्यात आल्या.अशा अफवांपासून सावध राहा,कारण त्या लोकांना विकासापासून दूर ठेवण्यासाठी पसरवल्या जातात,” असे त्यांनी स्पष्ट केले.अश्यातच नक्षलपीडित कुटुंबीयांतील सदस्यांना विविध विभागांमध्ये गट क व ड च्या पदांवर थेट नियुक्ती देण्याचा शासन निर्णय २०१८ मध्ये निघाला होता.यानुसार नक्षलपीडित कुटुंबांतील २३ युवक-युवतींना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते काल, मंगळवारी २२ जुलैला थेट पोलिस शिपाईपदी नियुक्तीपत्र देण्यात आले.नियुक्ती मिळालेल्यांच्या कुटुंबांतील लोकांची नक्षल्यांनी क्रूरपणे हत्या केली होती.सैरभैर झालेल्या कुटुंबांना यामुळे आधार मिळाला आहे.कृषी महाविद्यालयाच्या प्रांगणातील एक कोटी वृक्ष लागवड मोहिमेच्या प्रारंभप्रसंगी पोलिस दलाचा कार्यक्रमही पार पडला.प्रातिनिधिक स्वरूपात दोन नक्षलपीडित तरुणांना मुख्यमंत्र्यांच्या हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

राज्यांतर्गत पिकस्पर्धा; आता शेतकऱ्यांना घरबसल्या अर्ज करण्याची सुविधा..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील अन्नधान्य,कडधान्य व गळीतधान्य पिकांची उत्पादकता वाढविण्यासाठी तसेच प्रयोगशील व प्रगतशील शेतकऱ्यांच्या कार्याचा गौरव करून आधुनिक कृषी तंत्रज्ञानाचा प्रसार करण्याच्या उद्देशाने...

राज्य सरकार म्हणतेय; गौण खनिजांच्या अवैध उत्खनन आणि वाहतुकीवर दहापट दंड आकारू.. -चोर खरोखरच चोऱ्या करणे सोडणार काय?

उद्रेक न्युज वृत्त :-गौण खनिजांची चोरी करणे ही काही चोरट्यांसाठी नित्याचीच बाब झाली आहे.काहींना अवैध रेती,मुरूम,दगड,माती व इतर गौण खनिजांची चोरी केल्याशिवाय चैनच पडेनासे...

नक्षली संघटनेला मोठा हादरा; जहाल नक्षलवादी सुरक्षा दलांच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-नक्षल चळवळीतील शेवटचा सक्रिय सर्वोच्च नेता मिसिर बेसरा याची झारखंडच्या सारंडा जंगलात अन्नावाचून कोंडी झाल्याने मोजक्या नक्षलवाद्यांसह जंगलात भटकत असतांनाच त्याच्या अंगरक्षकासह...

जिल्हा कारागृहात कैद्यांची आरोग्य तपासणी व लसीकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जागतिक हेपाटायटिस दिनानिमित्त जिल्हा सामान्य रुग्णालय,गडचिरोली यांच्या राष्ट्रीय विषाणूजन्य यकृतदाह नियंत्रण कार्यक्रम(NVHCP) अंतर्गत जिल्हा खुले कारागृह,गडचिरोली येथे आरोग्य जनजागृती, वैद्यकीय तपासणी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!