Thursday, June 4, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तबदलते हवामान भारतासाठी धोकादायक.. - अर्थव्यवस्थेत वेळीच सुधारणा करण्याचे जागतिक बँकेचे आवाहन..

बदलते हवामान भारतासाठी धोकादायक.. – अर्थव्यवस्थेत वेळीच सुधारणा करण्याचे जागतिक बँकेचे आवाहन..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

उद्रेक न्युज वृत्त :-आंतरराष्ट्रीय वित्तीय संस्था असलेल्या जागतिक बँकेकने (world bank)नुकतेच बदलत्या हवामानावर आधारित अहवाल प्रसिद्ध केला आहे. बदलते हवामान भारतासाठी येत्या काळात संकटमय ठरू शकते,असे जागतिक बँकेने म्हटले आहे.अश्यातच अर्थव्यवस्थेत वेळीच सुधारणा केली गेली नाही तर भारताला मोठ्या आर्थिक संकटांचा सामना करावा लागणार असल्याचेही जागतिक बँकेने स्पष्ट केले आहे. दरवर्षी पाऊस आणि बदलत्या हवामानाचा भारताच्या मोठ्या शहरांना फटका बसतो आहे.यामुळे मोठ्या प्रमाणावर नुकसान आणि आर्थिक बाबींना सामोरे जावे लागते.त्यामुळे, होणाऱ्या अतिरेकी हवामान घटनांना तोंड देण्यासाठी भारताला २०५० पर्यंत वेगाने वाढणाऱ्या शहरांमध्ये $२.४ ट्रिलियन डॉलर(सुमारे २०० लाख कोटी रुपये) पेक्षा जास्त गुंतवणूक करावी लागेल.जागतिक बँकेने काल मंगळवारी बदलत्या हवामानावर आधारित अहवाल प्रसिद्ध केला आहे.ज्यामध्ये म्हटले की,२०५० पर्यंत भारतातील शहरी लोकसंख्या जवळजवळ दुप्पट होऊन ९५१ दशलक्ष होईल.यामुळे अनियमित पाऊस, उष्णतेच्या लाटा आणि समुद्राच्या वाढत्या पातळीला शहरे अधिक असुरक्षित होतील.त्याचवेळी गृहनिर्माण, वाहतूक,पाणी आणि कचरा व्यवस्थापन प्रणालींमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक केली गेली नाही तर हवामानाशी संबंधित नुकसानीमुळे भारताला होणारा खर्च वेगाने वाढेल असाही अहवालात इशारा दिला आहे.सध्या शहरी पुरामुळे भारताला दरवर्षी अंदाजे ४ अब्ज डॉलर्सचे नुकसान होत असून कोणत्याही सुधारणात्मक कारवाईशिवाय २०७० पर्यंत हे नुकसान ३० अब्ज डॉलर्सपर्यंत वाढू शकते.जागतिक बँकेच्या अहवालानुसार,२०२० मध्ये भारतातील शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांची संख्या ४८ कोटी होती जी २०५० पर्यंत ९५.१ कोटी होईल.म्हणजे शहरांवर लोकसंख्येचा दबाव वाढेल.अनियमित पाऊस,उष्णता आणि समुद्राच्या पातळीत वाढ यामुळे शहरांना वाढत्या धोक्याचा सामना करावा लागत आहे.भारताने आपल्या शहरांच्या गृहनिर्माण,वाहतूक,पाणी आणि योग्य कचरा व्यवस्थापन यासारख्या मूलभूत सुविधांमध्ये मोठी गुंतवणूक केली नाही तर त्याला हवामानाशी संबंधित समस्यांना तोंड द्यावे लागेल आणि पूर,उष्णता आणि अतिवृष्टीमुळे होणारे नुकसान सहन करावे लागेल,असाही इशारा अहवालात दिला.त्यामुळे वेळीच पाऊले उचलणे गरजेचे झाले आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!