Thursday, June 4, 2026
Homeदेसाईगंजपीएमश्री छत्रपती शिवाजी महाराज नगरपरिषद शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस साजरा.. -...

पीएमश्री छत्रपती शिवाजी महाराज नगरपरिषद शाळेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा वाढदिवस साजरा.. – वाढदिवसानिमित्त विद्यार्थ्यांना शालेय किटचे वाटप.

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा गडचिरोली जिल्ह्याचे पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवस दिनाचे औचित्य साधून
‘पीएमश्री छत्रपती शिवाजी महाराज नगरपरिषद उच्च प्राथमिक शाळा जुनी वडसा’ देसाईगंज येथे
शालेय विद्यार्थ्यांना उपयोगी साहित्य किटचे वाटप करून फडणवीस यांच्या वाढदिवसाचा कार्यक्रम विविध मान्यवरांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मोतीलाल कुकरेजा माजी उपाध्यक्ष,नगरपरिषद देसाईगंज हे होते.तर प्रमुख अतिथी म्हणून आकाश अग्रवाल जिल्हाध्यक्ष,उद्योग आघाडी,नरेश विठ्ठलानी माजी सदस्य,नगर परिषद देसाईगंज,सचिन खरकाटे तालुकाध्यक्ष देसाईगंज शहर तथा माजी आरोग्य सभापती नगर परिषद देसाईगंज,राजू जेठानी जिल्हा उपाध्यक्ष भाजप, चेतनदास विधाते भाजपा शहर महामंत्री,हेमाताई कावळे माजी सदस्य,वर्षा राऊत समाजसेविका,  श्रीमती कोडापे समाजसेविका तसेच शाळेचे मुख्याध्यापक किशोर चव्हान यांची उपस्थिती लाभली.कार्यक्रमाची सुरुवात पाहुण्यांचे स्वागत पुष्पगुच्छ देऊन झाली.शाळेचे मुख्याध्यापक किशोर चव्हाण यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना सादर केली.यानंतर सर्व मान्यवरांनी आपल्या मनोगतातून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्याची स्तुती करत वाढदिवस साजरा करून त्यांच्या दीर्घायुष्याची सदिच्छा व्यक्त केल्या.प्रसंगी विद्यार्थ्यांना मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त उपस्थित मान्यवरांच्या हस्ते भेटवस्तूसह उपयोगी साहित्य किटचे वाटप करण्यात आले.कार्यक्रमाचे संचलन शिक्षक आर.व्ही.मस्के यांनी केले.तर कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शाळेचे शिक्षक शिवराम हाके,राहुल भैसारे,श्रीमती मेश्राम यांचे योगदान मोलाचे राहिले.शेवट शिक्षक पठाण यांनी सर्व पाहुण्यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

डिझेलचा टँकर पलटी होताच इंधन नेण्यासाठी लोकांची झुंबड..

उद्रेक न्युज वृत्त  वर्धा :-आधीच इंधन कमतरतेमुळे पेट्रोल पंपावर गर्दी होतांना दिसून येते.अश्यातच एखाद्या घटनेत चक्क इंधनाचा टँकर पलटी होऊन डिझेलचा महापूर होत असल्याची बाब...

तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्य शासनाच्या महाडीबीटी पोर्टलवरील ‘शेतकरी योजना’ या उपक्रमांतर्गत कडधान्य आत्मनिर्भरता अभियान सन २०२६-२७ अंतर्गत तूर प्रमाणित बियाणे वितरण घटकाचा लाभ घेण्यासाठी...

गोदाम बांधकाम,तेल काढणी युनिट,कडधान्य प्रक्रिया व पॅकेजिंग युनिटसाठी लाखो रुपयांपर्यंत अनुदान.. – बना स्वतःच मालक; ऑफलाईन अर्ज प्रक्रिया सुरू..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील भुईमूग,करडई,तीळ यांसारख्या तेलबिया पिकांचे तसेच तूर,हरभरा व इतर कडधान्यांचे उत्पादन वाढविण्यासोबतच त्यांचे मूल्यवर्धन आणि शेतकऱ्यांना अधिक आर्थिक लाभ मिळवून देण्यासाठी...

शाळेची पहिली घंटा वाजणार ‘या’ दिवशी..!

उद्रेक न्युज वृत्त :-महाराष्ट्र राज्यातील वाढती उष्णता लक्षात घेता यंदा शाळेची पहिली घंटा उशिरा सुरू होण्याच्या चर्चांना अखेर पूर्णविराम मिळाला असून यंदा २०२६-२७ या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!