Monday, August 24, 2026
Homeमुंबईविदर्भातील निष्पाप चेहऱ्यांवर 'महा स्माईल्स’ मोहिमेमुळे पुन्हा फुलणार हसू... - ओठ आणि...

विदर्भातील निष्पाप चेहऱ्यांवर ‘महा स्माईल्स’ मोहिमेमुळे पुन्हा फुलणार हसू… – ओठ आणि टाळू दुभंगलेल्यांसाठी नागपूर,गोंदिया, अकोला,वर्धा येथील रूग्णालयात केली जाणार मोफत शस्त्रक्रिया.. – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संवेदनशील पुढाकाराने शक्य..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
मुंबई :-बालकांच्या चेहऱ्यावरील दुभंगलेले ओठ (क्लेफ्ट) व फाटलेले टाळू (पॅलेट) या जन्मजात विकारावर उपचार आणि जनजागृती करून या बालकांच्या निरागस चेहऱ्यावर हसू फुलविणे,हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे ध्येय आहे.यासाठी त्यांनी विदर्भातील अशा बालकांवर उपचार आणि जनजागृतीची गरज ओळखत स्वयंसेवी संस्थांना आवाहन केले.मुख्यमंत्री फडणवीस यांच्या आवाहनाला ‘स्माईल ट्रेन इंडिया’ ही स्वयंसेवी संस्था आणि बजाज फिनसर्वच्या शेफाली बजाज यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.त्यामुळे मुख्यमंत्र्यांचे हे स्वप्न आता मिशनमोडवर साकार होतांना दिसत आहे. ‘स्माईल ट्रेन इंडिया’ ही आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संस्था आणि बजाज फिनसर्व यांच्या सामाजिक उत्तरदायित्वातून आता ही मोहीम पूर्णपणे मोफत राबविली जाणार आहे.‘महा स्माईल्स क्लेफ्ट जनजागृती आणि उपचार मोहीम’ ही केवळ वैद्यकीय मोहीम नसून,हजारो बालकांना नवजीवन देणारी एक आशावादी चळवळ ठरणार आहे.
या आगळ्यावेगळ्या मोहिमेचा नागपूर येथे ३१ जुलै २०२५ रोजी सकाळी ११ ते दुपारी १२.३० या वेळेत स्वामी विवेकांनद मेडिकल मिशन हॉस्पिटल,खापरी, येथून शुभारंभ होणार आहे.या पहिल्यावहिल्या उपक्रमाअंतर्गत पुढील ९० दिवसांत तीन विशेष मोबाईल व्हॅन विदर्भातील संपूर्ण ११ जिल्ह्यात फिरून लोकांमध्ये क्लेफ्ट विकाराविषयी माहिती देणार आहेत.यामध्ये लवकर निदान,उपचाराची शिफारस आणि गरजू बालकांसाठी मोफत शस्त्रक्रियांची नोंदणी असे विविध उपक्रम राबवले जाणार आहेत.या बालकांवर नागपूर,गोंदिया,अकोला,वर्धा येथील रूग्णालयात शस्त्रक्रिया केल्या जाणार आहेत.
क्लेफ्ट विकार हा जन्मजात असून यात ओठ आणि टाळू हे दुभंगलेले असतात.जवळपास ७०० मुलांपैकी एका मुलांमध्ये हा विकार दिसून येतो.यावर शस्त्रक्रिया करूनच हा विकास दूर करता येते.वेळीच उपचार केले नाहीत तर कान बधिर होणे,बोलण्यात अडथळा येणे अशा वेगवेगळ्या व्यंगासोबत सामाजिक एकटेपणा  येऊ शकतो.तथापि या विकारावर उपचार असून ६-७ शस्त्रक्रियेनंतर यावर पूर्णपणे मात करता येते.या सर्व शस्त्रक्रिया खर्चिक असल्याने आर्थिक दुर्बल कुटुंबातील व्यक्तींना ते परवडणारे नाही.म्हणूनच संवेदशील नेतृत्व असलेल्या मुख्यमंत्र्यांनी क्लेफ्ट वरील उपचार संपूर्ण मोफत व्हावे,यासाठी या विशेष मोहिमेचे आयोजन केले आहे.क्लेफ्ट विकार असलेल्या बालकांना वेळेवर उपचार मिळाल्यास त्यांचे जीवन पूर्णतः सामान्य होऊ शकते.यासाठी केवळ उपचारच नव्हे,तर जागरूकता ही देखील तितकीच गरजेची आहे.त्यामुळे ‘महा स्माईल्स’ ही मोहीम विदर्भातील बालकांसाठी आरोग्यदूत ठरणारी आहे.या मोहिमेमुळे ग्रामीण आणि आदिवासी भागातील हजारो कुटुंबांना एक नवीन आशेचा किरण दिसणार आहे.अपूर्ण माहितीमुळे दुर्लक्षित राहिलेल्या समस्येवर आता तज्ज्ञांच्या मदतीने प्रभावी उपचार मिळणार आहे.स्माईल ट्रेन आणि बजाज फिनसर्व यांच्या सहकार्याने महाराष्ट्राच्या ११ जिल्ह्यातील  मुलांमध्ये जन्मजात आलेले दुभंगलेले होठ आणि टाळू विकार दूर होऊन त्यांच्या जीवनात आशेचा किरण नक्कीच जागणार आहे,असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

अंगावर भिंत कोसळून चिमुकलीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  गोंदिया :-जिल्ह्याच्या अर्जुनी मोरगाव तालुक्यातून आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी एक अत्यंत दुर्दैवी घटना समोर आली आहे.अर्जुनी मोरगाव तालुक्यातील खामखुरा गावात घरासमोरील अंगणात...

माता व बालक मृत्यू प्रकरणी चौकशी समिती गठीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या चामोर्शी येथील प्रसूती प्रकरणात माता व बालकाच्या मृत्यूची सखोल व निष्पक्ष चौकशी करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक स्तरावर चौकशी समिती गठीत करण्यात...

देसाईगंज आदर्श महाविद्यालयात वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना.. – विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर बनावे- प्रा.डॉ.निलेश हलामी

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-आदर्श कला,वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय देसाईगंज येथे महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.डाॅ.श्रीराम गहाणे यांच्या मार्गदर्शनात शैक्षणिक सत्र २०२६-२७ करिता वाणिज्य विद्यार्थी अभ्यास मंडळाची स्थापना...

धावत्या बसमधून खाली कोसळताच दुसऱ्या बसने चिरडले; तरुणीचा दुर्दैवी मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  पुणे :-पुण्यातील सिंहगड मार्गावरील माणिकबाग परिसरात आज,सोमवार २४ ऑगस्ट रोजी सकाळी दहा वाजेच्या सुमारास भीषण अपघाताची घटना घडली. खानापूर-स्वारगेट मार्गावरील धावत्या पुणे...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!