Sunday, June 28, 2026
Homeचंद्रपूरमोबाईलवरील 'एसीके फाइल' डाउनलोड करताच उडाले ९ लाख ३६ हजार..

मोबाईलवरील ‘एसीके फाइल’ डाउनलोड करताच उडाले ९ लाख ३६ हजार..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -

चंद्रपूर :-सायबर भामटे नवनवीन शक्कल लढवून अनेकांच्या बँक खात्यावर डल्ला मारू लागले आहेत. सर्वत्र बँक तसेच बातम्या प्रसारित करून सावधानतेचा इशारा देऊनही काहीजण सायबर चोट्यांच्या जाळ्यात अडकले जात आहेत.असाच एक प्रकार चंद्रपूर जिल्ह्याच्या भद्रावती शहरात उघडकीस आला आहे.भद्रावती शहरातील एका मोबाइल व्यावसायिकाच्या खात्यातून सायबर चोरट्यांनी तब्बल ९ लाख ३६ हजार ३६८ रुपये उडवले असल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे.सतीश भिवगडे यांचे भद्रावती शहरात मोबाइलचे दुकान आहे.त्यांनी एचडीएफसी बँकेत गोल्ड लोनसाठी मागणी केली होती.त्यासाठी कागदपत्रे सादर केली. मात्र,बैंक कार्यवाहीसाठी विलंब झाल्याने ते घरी गेले.काही वेळेनंतर त्यांना एचडीएफसी बँकेचा लोगो असलेला मॅसेज आला.त्यात गोल्ड लोनसाठी मागणी केल्याचे नमूद होते.केवायसी केल्यानंतर मोबाइलवर एसीके फाइल डाउनलोड करण्यास सांगितले.त्यांनी ते करताच बँकेची संपूर्ण माहिती त्या व्यक्तीकडे पोहोचली.काही वेळातच त्यांच्या बँक खात्यातून ९ लाख ३६ हजार ३६८ रुपये गायब झाले.डेबिट चा मॅसेज येताच सतिश यांना धक्काच पोहचला.लगेच त्यांनी पोलिसांत धाव घेतली,तोपर्यंत फार उशीर झाला होता.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोबाईल बँकिंग ॲप अपडेट करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्याला चुना.. – सायबर चोरट्यांनी ९ लाख ९७ हजार उडवले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाईल बँकिंग ॲप अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका धान्य व्यापाऱ्याची तब्बल ९ लाख ९७ हजार ७८० रुपयांची फसवणूक केली.या प्रकरणी...

अवैध रेती उत्खनन प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठ्याची विकेट.. – देसाईगंज तहसीलदारही होणार निलंबित; कोंढाळा-सिंड्राई रेती घाट प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील  कोंढाळा-सिंड्राई वैनगंगा नदी रेतीघाट परिसरात अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर...

उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द; पेपरफुटीने खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी 'नीट यूजी-२०२६' ची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करून नव्याने घ्यावी लागल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती.अश्यातच आता...

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!