Thursday, September 3, 2026
Homeभंडाराअडीच महिन्यांपूर्वी नव्याने रुजू झालेल्या २८ वर्षीय तलाठ्याचा अपघाती मृत्यू..

अडीच महिन्यांपूर्वी नव्याने रुजू झालेल्या २८ वर्षीय तलाठ्याचा अपघाती मृत्यू..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
भंडारा :-जिल्ह्याच्या मोहाडी तालुक्यातील नेरी (पाचगाव) येथे अडीच महिन्यांपूर्वी नव्यानेच तलाठी म्हणून रुजू झालेल्या २८ वर्षीय अजय पांडुरंग परचाके यांचा दुचाकी अपघातात मृत्यू झाल्याची घटना काल,रविवारी  दुपारी १२ वाजताच्या सुमारास भंडारा वरठी मार्गावरील गणेशनगरी जवळ दाभा येथे घडली.अजय परचाके हे मूळचे चंद्रपूर जिल्ह्याचे रहिवासी होते.मोहाडी तहसील कार्यालयात तलाठी म्हणून ६ फेब्रुवारी २०२५ रोजी रुजू झाले होते.रेतीचा जप्त केलेला साठा घरकुल लाभार्थ्यांना वाटप करण्यासाठी नेरी येथील तलाठी अजय परचाके हे खमारी बुज.येथे गेले होते.त्यानंतर अजय परचाके हे खमारी येथून नेरीचे कोतवाल रमेश मेश्राम यांच्यासोबत दुचाकी क्रमांक-एएच ४० एबी-८४२० ने परतीच्या मार्गावर असतांना गणेशनगरी दाभा येथे मागून येणाऱ्या रोहित शंकर भुरे वय २१ वर्षे, रा.टाकळी,भंडारा याने एमएच ३६ एपी ५११७ क्रमांकाच्या दुचाकीने जोरदार धडक दिली.यात परचाके हे खाली कोसळल्याने डोक्याला गंभीर दुखापत झाली.त्यातच दुसऱ्या दुचाकीस्वारालाही दुखापत झाली.दोघानांही तात्काळ भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात नेण्यात आले. अशातच तपासणीअंती तलाठी परचाके यांना वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मृत घोषित केले.तसेच दुसऱ्या चालकावर उपचार सुरू असल्याची माहिती आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!