Sunday, June 28, 2026
Homeमुंबईविदर्भ,मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान.. - चंद्रपूर,गडचिरोलीसह पाच जिल्ह्यांना पाच दिवस अवकाळी झोडपणार...

विदर्भ,मराठवाड्यात पावसाला पोषक हवामान.. – चंद्रपूर,गडचिरोलीसह पाच जिल्ह्यांना पाच दिवस अवकाळी झोडपणार…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 

मुंबई :-विदर्भातील ब्रम्हपुरी आणि अकोला येथे तापमानाने ४५ अंशांचा उच्चांक गाठला आहे.याच वेळी हवामान विभागाने राज्यात वादळी पावसाचे आणि गारपिटीचे इशारे दिले आहेत.सूर्याच्या आगीत राज्य भाजून निघत असतांना आता वादळी पावसाला पोषक हवामान झाले आहे.सोलापूर,लातूर,धाराशिव, नांदेड जिल्ह्यांत तुरळक ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाज असल्याने येलो अलर्ट म्हणजेच दक्षतेचा इशारा हवामान विभागाने दिला आहे.अशातच आता हवामान खात्याने विदर्भात पाच दिवस अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे.त्यात दोन जिल्ह्यांमध्ये गारपीटीचीही शक्यता वर्तविण्यात आली आहे.विदर्भ,मराठवाड्यात काही ठिकाणी पावसाला पोषक हवामान आहे.त्यामुळे विदर्भातील काही ठिकाणी पुढील पाच दिवस वादळी पावसाचा अंदाज आहे.मध्य महाराष्ट्रातही काही भागात ढगाळ वातावरणासह हलक्या सरी पडतील,असाही अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.विदर्भातील यवतमाळ,चंद्रपूर आणि गडचिरोली जिल्ह्यात काही ठिकाणी गारपीट होण्याचीही शक्यता आहे.चंद्रपूर, नागपूर,वर्धा,गडचिरोली आणि गोंदिया जिल्ह्यांत पुढील पाच दिवस काही ठिकाणी विजांचा कडकडाटासह वादळ वारा व अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे.

Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

मोबाईल बँकिंग ॲप अपडेट करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्याला चुना.. – सायबर चोरट्यांनी ९ लाख ९७ हजार उडवले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाईल बँकिंग ॲप अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका धान्य व्यापाऱ्याची तब्बल ९ लाख ९७ हजार ७८० रुपयांची फसवणूक केली.या प्रकरणी...

अवैध रेती उत्खनन प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठ्याची विकेट.. – देसाईगंज तहसीलदारही होणार निलंबित; कोंढाळा-सिंड्राई रेती घाट प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील  कोंढाळा-सिंड्राई वैनगंगा नदी रेतीघाट परिसरात अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर...

उद्या होणारी शिक्षक पात्रता परीक्षा रद्द; पेपरफुटीने खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त :-नुकतीच वैद्यकीय प्रवेशासाठी घेतली जाणारी 'नीट यूजी-२०२६' ची परीक्षा पेपरफुटीमुळे रद्द करून नव्याने घ्यावी लागल्याने देशभरात एकच खळबळ उडाली होती.अश्यातच आता...

उद्याला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम.. -२ हजार ३०८ लसीकरण केंद्रे,१२३ ट्रान्झिट व ९८ मोबाईल पथके सज्ज..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील एकही बालक पोलिओ लसीकरणापासून वंचित राहू नये,या उद्देशाने जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागामार्फत उद्या,रविवार २८ जून २०२६ रोजी संपूर्ण जिल्ह्यात राष्ट्रीय...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!