Sunday, June 28, 2026
Homeदेसाईगंजदेसाईगंज तालुक्यात विजेच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस.. - दोन दिवस अवकाळीची हजेरी..

देसाईगंज तालुक्यात विजेच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस.. – दोन दिवस अवकाळीची हजेरी..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-दोन दिवसांपासून दिवसा कडक उन्ह तर सायंकाळी ७ च्या सुमारास विजेच्या गडगडाटासह वादळी वाऱ्यासह पाऊस हजेरी लावत आहे.त्यामुळे उन्हाच्या काहीली पासून रात्रीच्या सुमारास नागरिकांना थोडाफार दिलासा मिळू लागला आहे.काल शनिवार व आज,रविवार २७ एप्रिलला सायंकाळच्या सुमारास देसाईगंज तालुक्याच्या कुरुड, कोंढाळा, देसाईगंज शहर व इतर काही भागात वादळी वारा, विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाच्या दमदार सरी बरसल्या.त्यामुळे काल व आज वीजपुरवठा खंडित झाला.दुपारी उन्हाचा तडाखा बसला तर सायंकाळी तापमान घटले.देसाईगंज तालुका व्यतिरिक्त इतरही तालुक्यात विजेचा गडगडासह रिमझिम पाऊस बरसला.अशातच सायंकाळच्या सुमारास अवकाळी पाऊस व दिवसा कडक उन्ह तापू लागल्याने आरोग्य विषयक समस्या भेडसावू शकतात,त्यामुळे नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

इसमाची गळफास घेऊन आत्महत्या; आरमोरी शहरातील घटना..

उद्रेक न्युज वृत्त  आरमोरी(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या आरमोरी शहरात एका ६५ वर्षीय इसमाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची खळबळजनक घटना आज, रविवार २८ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस...

सिंचन सुविधांचा विस्तार करण्यासाठी शेतकऱ्यांना पोकरा योजनेतून पंप संचावर ९० टक्के तर पीव्हीसी पाइप संचावर १०० टक्के अनुदान.. – शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे...

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील निवड झालेल्या ५३२ गावांतील अनुसूचित जाती(SC)व अनुसूचित जमाती (ST)प्रवर्गातील शेतकऱ्यांसाठी नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प(पोकरा)अंतर्गत सिंचन सुविधांचा विस्तार करण्यासाठी मोठी...

मोबाईल बँकिंग ॲप अपडेट करण्याच्या बहाण्याने व्यापाऱ्याला चुना.. – सायबर चोरट्यांनी ९ लाख ९७ हजार उडवले..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-मोबाईल बँकिंग ॲप अपडेट करण्याच्या बहाण्याने सायबर चोरट्यांनी एका धान्य व्यापाऱ्याची तब्बल ९ लाख ९७ हजार ७८० रुपयांची फसवणूक केली.या प्रकरणी...

अवैध रेती उत्खनन प्रकरणी मंडळ अधिकारी व तलाठ्याची विकेट.. – देसाईगंज तहसीलदारही होणार निलंबित; कोंढाळा-सिंड्राई रेती घाट प्रकरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्याच्या देसाईगंज तालुक्यातील  कोंढाळा-सिंड्राई वैनगंगा नदी रेतीघाट परिसरात अवैध रेती वाहतूक करणारा ट्रॅक्टर पलटी होऊन एका व्यक्तीचा मृत्यू झाल्याच्या घटनेची गंभीर...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!