Thursday, September 3, 2026
Homeदेसाईगंजकर वसूल करताय,पण नागरिकांच्या आरोग्याचे काय? देसाईगंज शहरातील आंबेडकर व माता...

कर वसूल करताय,पण नागरिकांच्या आरोग्याचे काय? देसाईगंज शहरातील आंबेडकर व माता वार्डात घाणीचे साम्राज्य..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
देसाईगंज(गडचिरोली):-पावसाळा सुरू व्हायला बराच कालावधी असून ऐन उन्हाळ्यात सुरू झालेल्या अवकाळी पावसाने देसाईगंज शहराच्या आंबेडकर व माता वॉर्डातील प्राथमिक शाळेच्या समोर असलेल्या नाल्यांचे पाणी तुंबल्यामुळे परिसरात घाणीचे साम्राज्य पसरले आहे.यामुळे परिसरात दूषित पाणी आणि दुर्गंधीचा साच होऊन शाळेतील विद्यार्थ्यांचे तसेच नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असूनही याकडे देसाईगंज नगरपरिषद प्रशासनाचे अक्षम्य दुर्लक्ष होतांना दिसून येत आहे.त्यामुळे कर वसूल करताय, पण नागरिकांच्या आरोग्याचे काय?असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जातो आहे.
नगर परिषद प्रशासन साफसफाईसाठी नागरिकांकडून कर वसूल करीत असते. कराच्या माध्यमातून आरोग्य,दिवाबत्ती,रस्ते,नाले सफाई व इतर कामे नगर परिषद प्रशासनाच्या वतीने करण्यात येतात.परंतु करण्यात येणारी नाली सफाई  कागदावरच होत असते.असा गंभीर आरोप काँग्रेस युवा नेते पिंकू बावणे यांनी नगर प्रशासनाला केला आहे.सध्या स्थितीत एक पाऊस पडला आणि नाल्यांमध्ये पाणी तुंबले,तर पावसाळ्यात या नाल्यांची स्थिती काय होईल?अशातच प्रशासनाने याकडे तातडीने लक्ष घालून नाल्यांची साफसफाई व स्वच्छता न केल्यास काँग्रेसच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशाराही बावणे यांनी दिला आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आज ११ आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या व नियुक्त्या..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्य सरकारने आज,गुरुवार ३ सप्टेंबर २०२६ रोजी तब्बल ११ सनदी अधिकाऱ्यांच्या (आयएएस) बदल्या व नियुक्त्या केल्या आहेत.यात भारतीय प्रशासकीय सेवेतील जिल्हा...

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांसाठी राज्यस्तरीय स्पर्धा; उत्कृष्ट मंडळांना मिळणार पुरस्कार..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-राज्यातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या विधायक कार्याला प्रोत्साहन देण्यासाठी पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत ‘महाराष्ट्र राज्य सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ स्पर्धा-२०२६’ आयोजित करण्यात...

देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील जप्त केलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा नष्ट..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-देसाईगंज पोलीस स्टेशन हद्दीतील १८५ गुन्ह्यांच्या नोंदीतुन जप्त करण्यात आलेला तब्बल १० लाख ९१ हजार ३९० रुपयांचा दारुसाठा आज,गुरुवार ३ सप्टेंबर रोजी...

अपघातात शिक्षकाचा दुर्दैवी मृत्यू..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूरच्या बुटीबोरी परिसरातील लोकमत प्रेस ते सिडको कॉलनी मार्गावर अंधारात उभ्या असलेल्या ट्रकला दुचाकीची मागून जोरदार धडक बसल्याने झालेल्या अपघातात शिक्षकाचा उपचारादरम्यान...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!