Saturday, June 20, 2026
Homeचंद्रपूरमजुरास ठार करून मृतदेहाजवळच बसून होता वाघ...!

मजुरास ठार करून मृतदेहाजवळच बसून होता वाघ…!

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
चंद्रपूर :-वाघाचे हल्ले मोठ्या प्रमाणावर वाढू लागले आहेत.हल्ल्यांमुळे शेतकरी तथा नागरिक भयभीत होऊन शेतावर जाण्यासाठी तसेच शेतीची कामे करण्यासाठी घाबरत आहेत.अशातच काल,मंगळवारी १४ जानेवारीच्या सकाळी १० वाजताच्या सुमारास
वाघाच्या हल्ल्यात मजूर ठार झाल्याची घटना चंद्रपूर जिल्ह्याच्या बल्हारशाह वनपरिक्षेत्रात घडली. लालसिंग बरेलाल मडावी वय ५७ वर्षे रा.मणिकपूर माल (बेहराटोला) ता. बिछाया जि.मंडला राज्य मध्यप्रदेश असे मृताचे नाव आहे.
सदर घटनेची माहिती मिळताच सहाय्यक वनसंरक्षक मध्य चांदा वनविभाग चंद्रपूर व वनपरिक्षेत्र अधिकारी बल्हारशाह आपल्या अधिनस्त वनकर्मचाऱ्यांसह तात्काळ घटनास्थळी दाखल झाले.तेव्हा वाघ हा मृतदेहाजवळच बसून होता.वाघाला हुसकावून लावण्याचा प्रयत्न केला असता वाघाने वनकर्मचाऱ्यांच्या दिशेने धूम ठोकली.दुपारी ४ वाजताच्या सुमारास अति शिघ्र दलाला पाचारण करण्यात आले.पशुवैद्यकीय अधिकारी वन्यजीव उपचार केंद्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प चंद्रपुर यांचे मार्गदर्शनात शुटर अविनाश फुलझेले यांनी वाघाला डॉट मारुन वाघाला बेशुध्द केले.त्यानंतर मृतदेह ताब्यात घेऊन पोलिस कर्मचाऱ्यांच्या समक्ष मोका पंचनामा करण्यात आला.तसेच मृत व्यक्तीचे नातेवाईकास सानृग्रह आर्थिक मदत देण्यात आली. ही कारवाई पोलिस निरीक्षक सुनील गाडे,क्षेत्र सहाययक के.एन.घुगलोत,व्हि.पी.रामटेके,वनरक्षक सुधीर बोकडे, अनिल चौधरी,धर्मेंद्र मेश्राम,तानाजी कामले,वर्षा पिपरे, उषा घोडवे,वैशाली जेनेकर,माया पवार,पुजा टोंगे आदी कर्मचाऱ्यांनी केली.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता भाडेपट्ट्यावरील शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखात असणार ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील भाडेपट्ट्याने प्रदान करण्यात आलेल्या शासकीय जमिनींच्या अधिकार अभिलेखातील नोंदी अधिक अचूक,पारदर्शक आणि एकसमान करण्यासाठी राज्य शासनाने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे.मुख्यमंत्री...

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!