Saturday, June 20, 2026
Homeउद्रेक न्युज वृत्तआता 'पीएम किसान' योजनेचा लाभ कुटुंबातील एकाच व्यक्तीला... - 'या' लाभार्थ्यांचा होणार...

आता ‘पीएम किसान’ योजनेचा लाभ कुटुंबातील एकाच व्यक्तीला… – ‘या’ लाभार्थ्यांचा होणार पत्ता कट…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त :-शेतकऱ्यांना आर्थिक हातभार लागावा,या हेतूने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पीएम किसान योजनेंतर्गत ६ हजार रुपये देण्याचे जाहीर केले.त्यानुसार या योजनेची सुरुवात डिसेंबर २०१८ मध्ये करण्यात आली.तेव्हापासून शेतकऱ्यांना वर्षाला ६ हजार रुपये देण्यात येत आहेत.या योजनेमुळे शेतकऱ्यांची चांगली आर्थिक सोय झाली आहे.ज्यावेळी ही योजना सुरू झाली,त्यावेळी एकाच कुटुंबातील पती,पत्नी,मुलगा, मुलगी यांनी त्यांच्या नावावर असलेल्या शेतजमिनीच्या अनुषंगाने पीएम किसान योजनेसाठी अर्ज केले होते.त्यानुसार त्यांना या योजनेचा लाभ सुरू करण्यात आला. मात्र,आता पीएम किसान’ योजनेसाठी केंद्र सरकारने नवीन नियमावली लागू केली आहे.त्याअंतर्गत एकाच कुटुंबातील पती,पत्नी,मुलगा मुलगी लाभ घेत असल्यास त्यातील एकालाच यापुढे या योजनेचा लाभ घेता येणार आहे.त्यासाठी आता या योजनेसाठी अर्ज करतांना पती,पत्नी आणि मुले यांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य करण्यात आले आहे.त्याचबरोबर वारसान हक्क वगळता ज्या शेतकऱ्यांनी सन २०१९ पूर्वी जमीन खरेदी केली आहे; त्या शेतकऱ्यांना व डॉक्टर,इंजिनिअर आहेत जे आयकर भरतात,जे पेन्शनधारक आहेत,त्यांना यापुढे पीएम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही.
पीएम किसान योजनेचा १८वा हप्ता महाराष्ट्रातील निवडणुकीपूर्वी जाहीर करण्यात आला होता.हप्ता जाहीर होऊन जवळपास तीन महिने होत आहेत.१९ व्या हप्त्याबाबत चर्चा सुरू झाली आहे.केंद्र सरकार पुढील महिन्यात फेब्रुवारीमध्ये पीएम किसान सन्मान निधी योजनेचा १९वा हप्ता जारी करू शकते.मात्र,सरकारने हप्त्याचे पैसे हस्तांतरीत करण्याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

वाघाच्या हल्ल्यात शेतकऱ्याचा मृत्यू..

उद्रेक न्युज वृत्त  चंद्रपूर :-वाघाच्या हल्ल्यात एका शेतकऱ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना नागभीड तालुक्यातील गिरगाव येथे आज,शुक्रवार १९ जून रोजी सकाळच्या सुमारास उघडकीस आली.आत्माराम दसरू बोरकर...

कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच नक्षली समर्थक पोलिसांच्या तावडीत..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-तब्बल अकरा वर्षांपासून पोलिसांना गुंगारा देणारा नक्षल समर्थक अखेर पोलिसांच्या तावडीत सापडला.विशेष म्हणजे,कुटुंबीयांना भेटण्यासाठी गावात येताच त्यास अटक करण्यात आली.त्याचा शोध...

देसाईगंजात सुगंधित तंबाखूविक्री जोमात; आरमोरीत अवैध सट्टा-पट्टी,तर कुरखेड्यात दारूचा महापूर..

उद्रेक न्युज वृत्त  देसाईगंज(गडचिरोली):-गडचिरोली जिल्ह्याच्या विविध तालुक्यात अवैध धंद्यांनी डोके वर काढले असून देसाईगंज शहर व तालुक्यात सुगंधित तंबाखूची खुलेआम विक्री,तर आरमोरी शहरापासून ते ग्रामीण...

जीएसटी नंबर मिळवून दिले नं..! आता दहा हजार द्या.. – राज्यकर निरीक्षक लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-गलेलठ्ठ पगार असतांना एकदा कां ओवर कमाईची सवय लागली रे लागली,तर मग ज्या टेबलावर कुठलेही काम मोफत जरी होत असेल तरी...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!