Saturday, May 2, 2026
Homeनागपूरसावधान..! 'मी कर्ज मिळवून देण्याचे काम करते' म्हणीत महिलेने अनेकांना घातला गंडा..

सावधान..! ‘मी कर्ज मिळवून देण्याचे काम करते’ म्हणीत महिलेने अनेकांना घातला गंडा..

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
नागपूर :-दुसऱ्यांच्या नावावर २२.४८ लाखांचे कर्ज उचलून ती रक्कम परस्पर वापरून एका महिलेने तिच्या सहकाऱ्यांसह गंडा घातल्याची घटना जरीपटका पोलिस ठाण्याच्या हद्दीत घडली.
हर्षली कुशन सालवनकर वय ३६ वर्षे असे महिला आरोपीचे नाव आहे.ती सभ्यता निशांत गणवीर वय ४० वर्षे,इंदोरा,जरीपटका यांच्या घराजवळ भाड्याने राहायची.तिने सभ्यता यांच्याशी ओळख वाढवली व मी कर्ज मिळवून देण्याचे काम करते,अशी बतावणी केली.सभ्यता यांना मुलाच्या शिक्षणासाठी कर्जाची आवश्यकता असल्यामुळे त्यांनी एप्रिल २०२४ मध्ये हर्षलीला त्यासाठी आवश्यक कागदपत्रे दिली.आरोपी महिलेने तिचा साथीदार गौरव आदमने व इतरांसोबत
मिळून कर्ज मंजूर करून घेतले.तसेच आयफोन, टीव्ही,इतर प्रोडक्ट्सदेखील फायनान्स करवून घेतले. मात्र ते सभ्यता यांना न देता त्यांची परस्पर विक्री केली.तसेच कुठलाही ईएमआयदेखील भरला नाही. तिने अनिता गायकवाड,शिल्परेखा बुकानम,रितेश ग्रावकर,  हिमानी मेश्राम,शोभा बडगे,प्रज्ञा रहाटे,अक्षय बोरकर, विशाल तिरपुडे,प्रशांत उके,हर्षल रंगारी यांच्यासोबत असाच प्रकार केला.ही बाब समोर आल्यावर सर्वांनी तिला पैसे मागितले.त्यावर हर्षलीने त्यांना धनादेश दिला.मात्र,ते वटलेच नाही.अखेर २२.४८ लाखांची फसवणूक केल्याप्रकरणात सभ्यता यांनी जरीपटका पोलिस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी आरोपीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
आरोपी हर्षलीने ज्यावेळी कर्जासाठी कागदपत्रे घेतली तेव्हा दोन दिवसांत पैसे मिळतील असे सांगितले होते. तिने तक्रारदारांच्या नावावर विविध मोबाइल,टीव्ही घेतले तेव्हा तीन ईएमआय भरले होते.त्यामुळे कुणालाही हा प्रकार लक्षात आला नाही.चौथा ईएमआय न आल्याने समोरील कंपन्यांनी जेव्हा तक्रारदारांशी संपर्क केला तेव्हा हर्षलीचे पितळ उघडे पडले.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

येत्या शैक्षणिक वर्षापासून विद्यार्थ्यांच्या नावात आईचे नाव अनिवार्य..

उद्रेक न्युज वृत्त :-आईच्या योगदानाला विशेष सन्मान देण्यासाठी,लिंग समानतेला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सामाजिक समतोल राखण्यासाठी आता महाराष्ट्र राज्यातील शाळांमध्ये विद्यार्थ्यांच्या ओळखीच्या पद्धतीत महत्त्वपूर्ण बदल...

सहपालकमंत्र्यांच्या हस्ते बचत गटाच्या सहा महिला प्रभागसंघांना फिरत्या रेस्टॉरंटचे वितरण..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण महिलांच्या उत्पन्नात वाढ करून त्यांना सन्मानाने जगण्यासाठी 'उमेद' अभियान आणि जिल्हा प्रशासनाने एक अभिनव पाऊल उचलले आहे.महाराष्ट्र दिनाचे औचित्य...

माय-लेकीने राहत्या घरीच घेतला गळफास..!

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-बाळ जन्माला येताच मृत पावल्याने धक्क्यातून सावरण्यासाठी आईकडे राहायला गेलेल्या मुलीने आणि तिच्या आईने राहत्या घरीच गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना...

मोठा अनर्थ टळला; चक्क धावत्या बसचे चाक निघाल्याने प्रवाशांमध्ये खळबळ..

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-कधीकाळी धावती बस अचानकपणे बंद पडते, तर कधी गाडीच्या वरचा छप्परच उडून जातो.पावसात तर काही बसेसमध्ये चक्क छतावरून पाणी गळायला लागतो.अश्या...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!