Wednesday, August 5, 2026
Homeगडचिरोलीआमदार मसरामांची जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्याशी विविध विषयांवर महत्वपूर्ण चर्चा...

आमदार मसरामांची जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांच्याशी विविध विषयांवर महत्वपूर्ण चर्चा…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-जिल्ह्यासह आरमोरी विधानसभा मतदारसंघातील विकासकामांबाबत तसेच इतर विविध विषयांवर आरमोरी विधानसभा क्षेत्राचे आमदार रामदास मसराम यांनी गडचिरोली जिल्हाधिकारी अविश्यांत पंडा यांची नुकतीच भेट घेत महत्वपूर्ण चर्चा करून लवकरात लवकर जिल्ह्यातील समस्या मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करावेत,अशी मागणी केली आहे.
मसराम यांनी सर्वप्रथम ग्रामीण भागातील नागरिकांना जंगली प्राण्यांमुळे होणाऱ्या त्रासाबाबत तातडीने कार्यवाही करण्याची मागणी केली.वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमुळे निर्माण होणारे धोके कमी करण्यासाठी आणि विशेष बंदोबस्तासाठी शेतकऱ्यांना सरसकट सोलर तार,झटका मशीन तसेच फेंसिंग तार देण्याची आवश्यकता असल्याचे स्पष्ट केले.घरकुल योजनेंतर्गत लाभार्थ्यांना घरबांधणीसाठी आवश्यक असलेल्या रेतीपुरवठ्यावर चालू असलेल्या मुदतीत वाढ करण्यात यावी,यामुळे लाभार्थ्यांना त्यांच्या बांधकामाचे काम वेळेत पूर्ण करता येईल.तसेच जिल्ह्यातील विविध विकासात्मक प्रकल्पांवर सविस्तर चर्चा करण्यात आली.यात रस्ते, शिक्षण,आरोग्य,पाणीपुरवठा व रोजगार निर्मिती यांसारख्या मूलभूत सुविधांच्या सुधारणेसाठी धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज अधोरेखित करण्यात आली.या भेटीदरम्यान,जिल्ह्यातील प्रशासनाने सर्वसमावेशक विकास साधण्यासाठी अधिक सक्रिय होण्याचे आवाहन करण्यात आले.यावेळी संबंधित विभागांचे अधिकारीही उपस्थित होते.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

आता बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे जातवैधता प्रमाणपत्र तयार करणे पडणार महागात..

उद्रेक न्युज वृत्त :-बरेचदा जातवैधता प्रमाणपत्र अर्थात कॉस्ट व्यालीडिटी सर्टिफिकेट बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनवून शासकीय योजनांचा लाभ मिळवणे,शासकीय नोकरी,अभियांत्रिकी प्रवेश व इतर...

महामार्गाच्या विस्तारासाठी सरकारने शेतकऱ्यांना भूमिहीन करू नये- विजय वडेट्टीवार

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारा,गोंदिया,गडचिरोली आणि चंद्रपूरपर्यंत करण्यासाठी सुरू असलेल्या भूसंपादनात व सुपिक जमीन घेण्यासाठी प्रशासनाकडून बळजबरी केली जात असल्याचा आरोप...

गडचिरोली जिल्ह्याला ४८ आधार नोंदणी संच प्राप्त; इच्छुक सेवा केंद्र चालकांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात आधार नोंदणी व बायोमेट्रिक अद्ययावतीकरणाच्या सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी इच्छुक आपले सरकार सेवा केंद्र...

आता “पोलीस पाटी” अथवा “पोलीस” नाव लिहिलेल्या खासगी वाहनांवर होणार कारवाई..

उद्रेक न्युज वृत्त  मुंबई :-राज्यातील बरेचसे पोलीस अधिकारी व कर्मचारी त्यांच्या खासगी दुचाकी वा चारचाकी वाहनांवर 'पोलीस' असे लाल अक्षरात लिहिणे किंवा तशी पाटी लावून...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!