Wednesday, August 5, 2026
Homeगडचिरोलीशिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरीता अर्ज करण्याचे आवाहन...

शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्काराकरीता अर्ज करण्याचे आवाहन…

- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
- Advertisement -
उद्रेक न्युज वृत्त 
गडचिरोली :-महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा विभागाद्वारा राज्यातील सर्वोत्कृष्ट क्रीडापटूंना पट्टून व क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्तींना क्रीडा विभागाचा प्रतिष्ठेचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार प्रदान करण्यात येतो.क्रीडा क्षेत्रात विशेष उललेखनीय कार्य करणाऱ्या जेष्ठ क्रीडा महर्षिकरीता जीवन गौरव पुरस्कार,क्रीडा मार्गदर्शकांकरिता उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक,जिजामाता राज्य क्रीडा पुरस्कार (महिला क्रीडा मार्गदर्शक),शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (खेळाडू),शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (साहसी उपक्रम),शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार (दिव्यांग खेळाडू) असे पुरस्कार प्रदान करण्यात येतात.
शासन निर्णय दि.२९ डिसेंबर,२०२३ अन्वये व शासन निर्णय दि.२५ जानेवारी,२०२४ नुसार शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार सुधारीत नियमावली,२०२३ विहीत केली आहे.या नियमावलीनुसार सन २०२३-२४ या वर्षाच्या पुरस्कारासाठी राज्यातील क्रीडा मार्गदर्शक,खेळाडू,दिव्यांग खेळाडू व साहसी उपक्रमात सहभागी झालेले खेळाडू,व्यक्ती यांच्याद्वारा दि.१४ जानेवारी ते २६ जानेवारी २०२५ या कालावधीत ऑनलाईन पद्धतीने अर्ज मागविण्यात येत आहेत
अर्ज सादर करणाऱ्या इच्छूक क्रीडा मार्गदर्शक, खेळाडू,साहसी उपक्रम व दिव्यांग खेळाडू यांनी विहीत मुदतीत क्रीडा विभागाच्या https://sports.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर स्क्रोलिंग लिंक (Scrolling Link)मध्ये उपलब्ध करुन दिलेल्या लिंकवर दि.१४ जानेवारी ते २६ जानेवारी,२०२५ या कालावधीत व दि.२६ जानेवारी २०२५ रोजी रात्री १२ वाजेपर्यंत फक्त ऑनलाईन अर्ज सादर करण्यात यावेत.असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी भास्कर घटाळे यांनी केलेले आहे.
Udrek News

- Advertisement -

मुख्य संपादक

RELATED ARTICLES
LATEST ARTICLES

Recent News

ऑगस्ट महिन्यापासून गॅस कनेक्शनची ई-केवायसी असणे बंधनकारक; अन्यथा कनेक्शन होणार बंद..

उद्रेक न्युज वृत्त :-गॅस सिलिंडरचा काळाबाजार थांबवण्यासाठी आणि साठेबाजी उघड करण्यासाठी केंद्र सरकारने सार्वजनिक क्षेत्रातील गॅस कंपन्या इंडेन, एचपी आणि भारत गॅसच्या ग्राहकांसाठी स्वयंपाकाच्या...

आता बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे जातवैधता प्रमाणपत्र तयार करणे पडणार महागात..

उद्रेक न्युज वृत्त :-बरेचदा जातवैधता प्रमाणपत्र अर्थात कॉस्ट व्यालीडिटी सर्टिफिकेट बनावट किंवा खोट्या कागदपत्रांच्या आधारे बनवून शासकीय योजनांचा लाभ मिळवणे,शासकीय नोकरी,अभियांत्रिकी प्रवेश व इतर...

महामार्गाच्या विस्तारासाठी सरकारने शेतकऱ्यांना भूमिहीन करू नये- विजय वडेट्टीवार

उद्रेक न्युज वृत्त  नागपूर :-नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाचा विस्तार भंडारा,गोंदिया,गडचिरोली आणि चंद्रपूरपर्यंत करण्यासाठी सुरू असलेल्या भूसंपादनात व सुपिक जमीन घेण्यासाठी प्रशासनाकडून बळजबरी केली जात असल्याचा आरोप...

गडचिरोली जिल्ह्याला ४८ आधार नोंदणी संच प्राप्त; इच्छुक सेवा केंद्र चालकांनी अर्ज करण्याचे आवाहन..

उद्रेक न्युज वृत्त  गडचिरोली :-जिल्ह्यातील ग्रामीण व दुर्गम भागात आधार नोंदणी व बायोमेट्रिक अद्ययावतीकरणाच्या सेवा अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्यासाठी इच्छुक आपले सरकार सेवा केंद्र...

Visitor Counter

- Advertisment -spot_imgspot_img

Recent News

Most Popular

error: Content is protected !!